शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत ‘नोटा’ चा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अंदाजे ३ टक्के म्हणजेच २७ ते ३० हजार ग्रामीण मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायास ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अंदाजे ३ टक्के म्हणजेच २७ ते ३० हजार ग्रामीण मतदारांनी ‘नोटा’ या पर्यायास मत दिल्याने निवडणुकीत ‘नोटा’ चा बोलबाला पाहण्यास मिळाला. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक मैदानात होते. नोटा या पर्यायावर मते दिल्यामुळे अनेक ठिकाणी १० ते २० मतांच्या फरकाने उमेदवार विजयी झाले, तर १८ ठिकाणी समान मते मिळालेल्या ठिकाणी चिठ्ठी काढून विजयी उमेदवार घोषित करावा लागला.

१८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. तालुकानिहाय मतमोजणीची जबाबदारी असल्यामुळे तहसीलदार पातळीवरून सर्व माहिती संकलित करून अहवाल सरू करण्याचे काम बुधवारी देखील सुरू होते. ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ८९ सदस्य निवडून देण्यासाठी मतदान झाले. ३२ ग्रामपंचायत बिनविरोध होऊन ६१० सदस्य बिनविरोध निवडून आले होते. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ५ लाख ५१ हजार ८२२ महिला तर ६ लाख ४ हजार ८०४ पुरूष अशा एकूण ११ लाख ५६ हजार ६२६ पैकी ९ लाख ३३ हजार ३०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

१८ प्रभागांसाठी काढावी लागली चिठ्ठी

जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतीतील १८ प्रभागात उभ्या असलेल्या ३६ उमेदवारांना समान मते मिळाली. या ठिकाणी चिठ्ठी काढून उमेदवाराला विजयी घोषित करावे लागले. चुरशीची लढत झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. यामध्ये औरंगाबाद तालुक्यात ३, पैठण ३, वैजापूर ४, सिल्लोड १, गंगापूर १, फुलंब्री १ तर कन्नडमधील ५ ग्रामपंचायतीतील उमेदवारांना भाग्याने साथ दिल्याने त्यांचा विजय झाला.

आयोगाची माहिती अशी

राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त जे. टी. मोरे यांनी सांगितले, पूर्ण जिल्ह्यातून मतदान, नोटाची माहिती संकलन सुरू आहे. माहिती येताच ती आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल.

निवडणूक नियम काय सांगतो

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी उमेदवारांपेक्षा नोटा पर्यायाला अधिक मतं असतात, त्या ठिकाणी नोटानंतर सर्वाधिक मतं मिळविणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. परंतु औरंगाबाद जिल्ह्यात नोटामुळे निवडणूक नियम वापरण्याची गरज कुठे पडले नाही.

नोटाला मिळालेली एकूण मते

जिल्ह्यात सरासरी झालेल्या मतदानाच्या तुलनेत ३ टक्के मतदान नोटा या पर्यायाला मिळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २७ ते ३० हजारांच्या दरम्यान हे प्रमाण असल्याचे प्रशासकीय सूत्रांचे मत आहे. तालुकानिहाय माहिती संकलन सुरू असून त्यानंतर अंतिम आकडा समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले.