शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

एकगठ्ठा मतदानाचे ‘कवतिक’ नाही!

By admin | Updated: September 25, 2014 00:58 IST

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या विसंवादाचे प्रतिबिंब साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या विसंवादाचे प्रतिबिंब साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मसापच्या एकगठ्ठा मतांचे यंदा ‘कवतिक’ उरले नाही, अशी चर्चा साहित्य वर्तुळात रंगली आहे. मुळातच ‘उस्मानाबाद’चा घास हिरावून घेऊन ‘घुमान’च्या मुखात घातला गेल्याने मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील नाराज आहेत. याची परिणती सोमवारी पाहण्यास मिळाली. डॉ. सदानंद मोरे यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचविणारा अर्ज स्वीकारण्यास प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाले पाटील उपस्थित नव्हते. मात्र, ही प्रक्रिया संपल्यावर मसापमध्ये ठाले पाटील यांचे आगमन झाले व ते थेट आपल्या कार्यालयाकडे निघून गेले. नियोजित संमेलनाध्यक्ष हा मराठवाड्याच्या भूमीतील असावा, अशी उघड भूमिका ठाले पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे ठाले पाटील यांचा पाठिंबा कोणाला हे आता उघड गुपित झाले आहे. घुमान येथे संमेलन होत असताना अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक हे संमेलनाचे अध्यक्ष असावेत, अशी अपेक्षा प्रदर्शित करीत कोषाध्यक्ष डॉ. दादा गोरे यांनी मोरे यांची पाठराखण केली आहे. तर मतदार सुज्ञ असून ते योग्य उमेदवाराला निवडून देतील, अशी ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका कुंडलिक अतकरे यांनी घेतली आहे. या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भूमिकांमधील विसंवाद लक्षात घेता संमेलनाध्यक्षपदासाठी कोणत्याही उमेदवाराला एकगठ्ठा मतदान होणार नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. संमेलनाध्यक्ष निवडून देण्याच्या यादीमध्ये मतदाराचे ई-मेल अ‍ॅडे्रस आणि मोबाईल क्रमांकासह पूर्ण यादी देण्यामध्ये मसाप अपयशी ठरली आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाने यंदा केवळ नाव व पत्ता असलेली यादीच प्रसिद्ध केली आहे. या त्रुटींमुळे एकीकडे मतदारांपर्यंत पोहोचण्यात उमेदवारांची अडचण होत असून, ही बाब ध्यानात घेऊन भारत सासणे यांच्या प्रचारासाठी एका माजी संमेलनाध्यक्षांनीच कंबर कसली आहे. हे माजी संमेलनाध्यक्षही मराठवाड्यातील असल्याने यंदा मसापमधील मतदारांमध्येही फूट पडणार हे निश्चित.