शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमार नाही तर कार्तिक करणार धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:04 IST

अक्षय कुमारच्या ‘भुलभुलैया’ या सिनेमाचा दुसरा भाग १९ नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, ‘भुलभुलैया-२’ ...

अक्षय कुमारच्या ‘भुलभुलैया’ या सिनेमाचा दुसरा भाग १९ नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, ‘भुलभुलैया-२’ या सिक्वेलमध्ये अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यन मुख्य अभिनेत्याच्या तर कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तब्बूची या सिनेमात विशेष भूमिका पाहायला मिळणार आहे. समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या फोटोत कार्तिक आर्यनचा सिनेमामधील लूक दिसून येतोय. भगवी वस्त्रे आणि खांद्यावर झोळी घेतलेल्या कार्तिकचा लूक ‘भुलभुलैया’च्या पहिल्या भागातील अक्षय कुमारच्या लूकसारखाच दिसून येतोय.

सोहम बांदेकरचे कलाविश्वात पदार्पण

अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम लवकरच एका मालिकेच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पदार्पण करत आहे. आदेश बांदेकर निर्मित ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून सोहम मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. या मालिकेत सोहम पोलिसाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. ‘नवे लक्ष्य’ ही मालिका महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्यूटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे. सोहमची ही पहिलीच मालिका असल्याने त्याचा अभिनय पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.

जखमी टायगर श्रॉफला दिशाने धीर दिला

सेलिब्रिटींच्या फुटबॉल मॅचमध्ये टायगर श्रॉफ खेळता खेळता जखमी झाला. हे दृश्य पाहताच त्याला चिअर करायला मैदानात आलेल्या दिशा पटानीच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. बॉयफ्रेंडची ही अवस्था पाहून दिशाच्या चेहऱ्याचा जणू रंगच उडाला. जखमी झाल्यामुळे टायगरला मॅच अर्धवट सोडावली जागली. फिजिओथेरपिस्टने लगेच टायगरच्या जखमेवर प्राथमिक उपचार सुरू केले. टायगरची अवस्था दिशाला बघवेना. ती पूर्णवेळ त्याच्या बाजूला उभी राहून त्याला धीर देत होती. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.