शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

युतीच्या मुद्यावर सहमती नाहीच..!

By admin | Updated: December 30, 2016 00:01 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद नगर पालिकेत युती करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

उस्मानाबाद : उस्मानाबाद नगर पालिकेत युती करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सेनेसह भाजपानेही उपनगराध्यक्षपद आपल्यालाच द्यावे, अशी भूमिका घेतल्याने ही बैठक कुठल्याही निर्णयाविना संपल्याने आता हे दोन्ही पक्ष उस्मानाबाद पालिकेत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मकरंद राजेनिंबाळकर यांनी विजयश्री खेचून आणली. सेनेचा भगवा उस्मानाबाद पालिकेवर फडकाविला आहे. सध्यस्थितीत शिवसेनेकडे ११ सदस्य असून, भाजपाचे ८ सदस्य निवडून आले होते. मात्र नगरसेवक अनिल मंजुळे यांचे अपघाती निधन झाल्याने भाजपाची संख्याबळ आता ७ एवढे आहे, तर राष्ट्रवादीकडे सर्वाधिक १७ सदस्य असून, काँग्रेस २ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे. दरम्यान, नगराध्यक्षांनी पदभार घेतल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी उपनगराध्यक्षासह स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. पालिकेत शिवसेना-भाजपाची युती व्हावी असे मानणारा मोठा वर्ग आहे. शिवसेनेकडून नगरसेवक सुरज साळुंके उपनगराध्यक्षपदासाठी दावेदार आहेत. तर भाजपाकडून राहुल काकडे आणि योगेश जाधव यांची नावे चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमिवर या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेकडून माजी आमदार ओम राजेनिंबाळकर आणि नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, तर भाजपाकडून आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्र्णीे यांच्यासह नितीन काळे यांची उपस्थिती होती. बैठकीत शिवसेनेसह भाजपानेही उपनगराध्यक्ष पदाची मागणी केली. मात्र यावर कसलेही मतैक्य होऊ शकले नाही. उपाध्यक्षपद शिवसेनेला सोडा त्या बदल्यात विषय समिती सभापती पदे भाजपला देतो अशी शिवसेनेची भूमिका होती, तर उपाध्यक्षपद भाजपला सोडा बाकीचे नंतर पाहू, असे भाजपाचे म्हणणे होते. बैठकीच्या अखेरपर्यंत या मुद्द्यावर कसलेही एकमत न झाल्याने कुठल्याही निर्णयाविना बैठक संपविण्यात आली. (प्रतिनिधी)