शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ४१९ विद्यार्थ्यांची मास कॉपी नव्हेच! निकाल जाहीर,नापास विद्यार्थ्यांना संधी

By राम शिनगारे | Updated: November 9, 2023 08:43 IST

विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर सायंकाळी उत्तरपत्रिका ३०० ते ५०० रुपये घेऊन देण्यात येत असल्याचा व्हिडीओ एका विद्यार्थिनीने व्हायरल केला होता.

छत्रपती संभाजीनगर : एप्रिल महिन्यात शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर मास कॉपीचा प्रकार घडला नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांचा ‘होल परफाॅर्मन्स कॅन्सल’(डब्ल्यूपीसी)  रद्द करण्याची केलेली  शिफारसही रद्दबातल ठरविण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. ज्या उत्तरपत्रिकांमध्ये कॉपीचा प्रकार आढळला त्या विषयात संबंधित विद्यार्थ्यांवर नापासची कारवाई केली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.  विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर सायंकाळी उत्तरपत्रिका ३०० ते ५०० रुपये घेऊन देण्यात येत असल्याचा व्हिडीओ एका विद्यार्थिनीने व्हायरल केला होता. त्यामुळे ४ एप्रिल २०२३ रोजी एकच गोंधळ उडाला. या केंद्रावरील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तज्ज्ञांकडून तपासून घेतल्या. या उत्तरपत्रिका संबंधितांनी  निष्काळजीपणे तपासत मास कॉपी झाल्याचे लिहून दिले. हे प्रकरण तपासासाठी समितीकडे पाठविले. त्या समितीने प्राध्यापकांच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांचा होल परफॉर्मन्स कॅन्सल (डब्ल्यूपीसी)ची कारवाई करण्याची शिफारस परीक्षा मंडळाकडे केली. परीक्षा मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कुलगुरू डॉ. येवले यांनी स्वत:च ४ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. दरम्यानच्या कालावधीत उत्तरपत्रिका तपासणाऱ्या काही प्राध्यापकांनी आम्ही निष्काळजीपणे उत्तरपत्रिका तपासल्याचे लिहून दिले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तज्ज्ञांकडून पुन्हा तपासणी केली. त्यात विद्यार्थ्यांकडून मास कॉपी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले.

कर्मचारी डिबारसंबंधित परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांसह परीक्षेच्या कामातील सहभागींना तीन वर्षांसाठी परीक्षेच्या कामासाठी बंदी घालण्यात आली. 

शेंद्रा येथील परीक्षा केंद्रात घडलेला प्रकार हा मास कॉपी नव्हता. त्या प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी केली. जे विद्यार्थी थोडे फार दोषी आढळले त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई केली. त्याविषयीची संपूर्ण माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली.  - डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

टॅग्स :examपरीक्षा