शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आवक नसलेल्या शेतमालाचाही सौदा!

By admin | Updated: March 11, 2017 23:45 IST

लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज होणारी शेतमालाची आवक ही अनिश्चित असते़

लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज होणारी शेतमालाची आवक ही अनिश्चित असते़ त्यामुळे त्याचे दरही दररोज कमी जास्त होत असतात़ विशेष म्हणजे सौद्याच्या वेळी जो शेतमाल असतो त्यातच लिलाव होतो़ मात्र लातुरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी पाच प्रकारच्या शेतमालाची आवक शून्य असतानाही त्याचा सौदा निघाला आहे़ पाचपैकी दोन धान्याचा कमाल, किमान व सर्वसाधारण असा दरही जाहीर झाला़ बाजार समितीच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे़ गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरिपाबरोबर रबी हंगामातील पिकांना लाभ झाला आहे़ सध्या बहुतांश शेतकरी तूर व हरभऱ्याच्या राशी करण्यात मग्न आहेत़ ज्या शेतकऱ्यांच्या राशी झाल्या आहेत ते शेतकरी विक्रीसाठी शेतमाल बाजार समितीत आणत आहेत़ त्यामुळे आवक वाढत आहे़ त्याचबरोबर लातुरातील बाजार समितीत चांगला दर मिळतो, असा अनेक शेतकऱ्यांना अनुभव असल्याने जिल्ह्याबरोबर सीमावर्ती भागातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात़शुक्रवारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत १३ प्रकारच्या शेतमालाची आवक झाली़ त्यात सर्वाधिक आवक हरभरा, तूर आणि सोयाबीनची झाली असून, बाजरी, गहू, ज्वारी, मका, मूग, करडई, गूळ या शेतमालाची आवक अल्पप्रमाणात झाली होती़ एकूण आवक ३२ हजार २८४ क्विंटल झाली होती़ अंबाडी, जवस, कारळे, धने, मोहरी या शेतमालाची आवक झाली नसतानाही त्याचा सौदा पुकारण्यात आला़ वास्तविक पाहता दररोज आवक होणाऱ्या शेतमालाची पाहणी करून त्याचा सौदा होतो़ मात्र शुक्रवारी या पाच प्रकारच्या शेतमालाची आवक नसतानाही सौदा काढण्यात आला असल्याचे दिसून येत आहे़