शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅस’च्या प्रस्तावासाठी नोव्हेंबरपर्यंतची मुदत

By admin | Updated: September 14, 2014 00:23 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने ‘कॅस’ (करिअर अ‍ॅडव्हान्स स्कीम) अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदतवाढ दिल्यामुळे प्राध्यापक सुखावले आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने ‘कॅस’ (करिअर अ‍ॅडव्हान्स स्कीम) अंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यासाठी नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदतवाढ दिल्यामुळे प्राध्यापक सुखावले आहेत. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये कार्यरत प्राध्यापकांना वेतनश्रेणी व पदोन्नती मिळण्यासाठी ‘कॅस’अंतर्गत वर्षभरातील शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक सादर करावा लागतो. दरवर्षी विद्यापीठामार्फत असे प्रस्ताव मागविले जातात. चालू शैक्षणिक वर्षात २३ आॅगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन व तत्पूर्वी ‘ओपन डे’ कार्यक्रम घेण्यात आले. दुसरीकडे प्रस्ताव दाखल करण्याची मुदत ३१ आॅगस्टपर्यंतची होती. विद्यापीठातील कार्यक्रमांमध्ये प्राध्यापक व्यस्त राहिल्यामुळे त्यांना मुदतीमध्ये ‘कॅस’अंतर्गत प्रस्ताव दाखल करणे शक्य झाले नव्हते. प्राध्यापकांच्या मागणीनुसार कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी आॅगस्टऐवजी आता नोव्हेंबरअखेरपर्यंत असे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ जाहीर केली आहे. यासंबंधीचे परिपत्रक कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी नुकतेच ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, उस्मानाबाद येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राचे संचालक डॉ. अशोक मोहेकर व सर्व विभागप्रमुखांना पाठविले आहे. विद्यापीठामध्ये अध्यापन आणि संशोधनाचे काम करणाऱ्या शिक्षकांना सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रोफेसर आणि प्राध्यापक उच्चश्रेणी या क्रमाने पदोन्नती दिली जाते. त्यासाठी जे प्राध्यापक सलग ८ वर्षे कायमस्वरूपी अध्यापनाचे काम करतात त्यांनी ३०० अंकांचा शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक (अकॅडेमिक परफॉर्मन्स इंडेक्स) सादर करणे अनिवार्य असते. विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले शोधनिबंध, संशोधनात्मक कार्य, अध्यापनातील सातत्य व विशेषत्व आदींचा त्या निर्देशांकामध्ये समावेश असतो. ज्या शिक्षकाचा निर्देशांक सर्वोत्कृष्ट त्यास सेवांतर्गत पदोन्नती दिली जाते.