चेतन धनुरे, लातूरएमएच सीईटीत राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या मूळच्या अकलूजच्या आणि राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या देवेश शिळीमकर प्रथम आल्याचे यश सुखावणारे असल्याचे सांगितले. परंतु, तो या यशाला पहिला टप्पा मानतोय़् ‘मंजीले’ अजून दूर असल्याचेही सांगत त्याने आपल्या शैक्षणिक कष्टाचं चीज आपल्याला ‘नोबेल’च्या स्वरुपातून व्हावं, अशी त्याची इच्छा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मोठा भाऊ आणि बहिण दोघेही डॉक्टर असलेला देवेश मला वैद्यकीय क्षेत्रातील जेनेटिक्स’मध्ये स्वत:ला हरवून घेऊन नोबेल मिळवायचे असल्याचे ठासून सांगितले. देवेश हा मध्यमवर्गीय कुटूंबातील़ त्याचे कुटूंब मुळचे पुणे जिल्ह्यातील तांबारा येथील पण नोकरीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील अकलूजला विसावा घेतला. वडील तुलशीदास शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत तर आई तारका या गृहिणी़ भाऊ योगेश व बहीण रेणुका हे दोघेही वैद्यकीय शिक्षण घेत आहेत़ भाऊ पदव्युत्तरला तर बहिण पदवीला. देवेशचे दहावीपर्यंतचे शिक्षणही अकलूजच्या एसएमटी विद्यालयातून झालेले़ अकरावीला लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर देवेशने कठोर परिश्रम घेतले़ सकाळी ७ ते रात्री १२ असे दिवसातील १७ तास तो महाविद्यालय, शिकवणी अन् अभ्यासासाठी देत होता़ त्यामुळे तयारी परिपूर्ण झाली़ महाविद्यालयातील टेस्टमध्ये त्याने सातत्याने पहिला, दुसरा क्रमांक राखला होता़ एमएच सीईटीमध्येही त्याने हे सातत्य कायम राखून राज्यात पहिला येण्याचा मान मिळविला़ या यशाचे श्रेय देवेशचे वडील तुलशीदास यांनी दोन वर्षे देवेशसोबतच राहिलेल्या पत्नी तारका यांना दिले़ तर देवेशची आई तारका यांनी हे यश महाविद्यालय अन् देवेशचे असल्याचे सांगितले़महाविद्यालयाचे आभार : तुलशिदासमी शाहू महाविद्यालयाचे मनापासून आभार मानतो. दहावीनंतर शाहूच्या प्रांगणात मी माझे तिसरे अपत्य सोडले होते. विशेष म्हणजे हे तिसरेही डॉक्टर झाले. या महाविद्यालयात माझ्या तीनही मुलांचे असे करिअर झाले, हे आमच्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांना खुप सुख देणारे असल्याच्या भावना प्रा. तुलशिदास शिळीमकर यांनी मांडल्या. तिन्ही मुलं डॉक्टर झाल्याचे समाधान मोठे असल्याचे सांगून शैक्षणिक काळात मुले दूर गेल्याचे दु:ख आता कुठल्या कुठे पळून गेल्याचे ते म्हणाले.निकाल अनपेक्षित नव्हता : देवेश आपल्या यशाविषयी देवेश ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, हा निकाल अनपेक्षित नव्हताच़ पहिल्या पाचजणांमध्ये येण्याचा विश्वास होता़ परंतु, चक्क राज्यात पहिला आल्याचे कळाल्यानंतर मात्र आनंदाला पारावार राहिला नाही़ या यशाचे संपूर्ण श्रेय महाविद्यालयाला देतो़ त्यांनी खूप तयारी करवून घेतली़ फक्त आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी हवी़ सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास हवा़ महाविद्यालय व शिकवणीनंतर अभ्यासाला केवळ २ तासच दिले़ निकाल समोरच आहेत़
देवेश शिळीमकरला मिळवायचंय् नोबेल़़़
By admin | Updated: June 7, 2014 00:23 IST