शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपात आरक्षण नको

By admin | Updated: September 15, 2015 00:36 IST

औरंगाबाद : अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीत ‘राखीव’ आणि ‘अराखीव’ असा भेदाभेद करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे

औरंगाबाद : अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीत ‘राखीव’ आणि ‘अराखीव’ असा भेदाभेद करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए.व्ही. निरगुडे आणि न्या. व्ही.के. जाधव यांनी दिला आहे. अनुकंपा तत्त्वाच्या धोरणांतर्गत पाच टक्के जागा आरक्षित केल्या असताना पुन्हा त्या पाच टक्के जागांमध्ये ‘राखीव’ आणि ‘अराखीव’ असा वर्ग तयार करणे म्हणजे आरक्षणात पुन्हा आरक्षण ठेवल्यासारखे होते, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने १३ जून २००३ च्या शासन निर्णयाद्वारे अनुकंपा तत्त्वावर एकूण नेमणुकीच्या पाच टक्के जागा आरक्षित केल्या आहेत. शासकीय सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीस अथवा पाल्यास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय मानवीय दृष्टिकोनातून, मयताच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी घेण्यात आला होता. त्यासाठी एकूण जागांच्या ५ टक्के कोटा आरक्षित केला आहे. यासाठी निर्धारित कार्यपद्धतीसुद्धा वेळोवेळी आखून देण्यात आली आहे. लाभार्थीने विहित मुदतीत संबंधित खात्यास आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावयाचा असतो. जिल्हाधिकारी कार्यालयात यादी अनुक्रमांक तयार केले जातात. जागेच्या उपलब्धतेनुसार संबंधित खात्याकडे नावे पाठविली जातात. उमेदवाराच्या पात्रतेनुसार त्याला नेमणूक देण्याचे आदेश जिल्हाधिकारी देतात.अर्जदार बालाजी सीताराम मोरे यांचे वडील नांदेड येथील आरटीओ कार्यालयात कार्यरत असताना ७ सप्टेंबर १९९७ रोजी वारले. अर्जदाराने अनुकंपा तत्त्वावर अर्ज सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला ‘वॉचमन’ या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याची शिफारस केली. अर्जदार हे महादेव कोळी (एस.टी.) या अनुसूचित जमातीचे असल्यामुळे त्यांना नेमणूक देताना वैधता प्रमाणपत्राच्या अधीन राहून दिली. जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नेमणूक दिली जाईल, अशा अटीवर आदेश काढले. अर्जदाराने सदर आदेशास अ‍ॅड. अनिल गोलेगावकर आणि अ‍ॅड. मधुर गोलेगावकर यांच्या मार्फत आव्हान दिले असता खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्वाळा दिला. या प्रकरणात शासनाच्या वतीने अ‍ॅड. डी.बी. भांगे यांनी काम पाहिले.