नांदेड: एलबीटी की जकात याबाबतचा निर्णय महापालिकेने घ्यावा असे निर्देश शासनाने दिले आहेत़ परंतु एलबीटी नको अन् जकातही नको, असा पवित्रा शहरातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे़ त्यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत़जकातसारखा कालबाह्य कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी व्यापाऱ्यांनी उग्र आंदोलन केले़ परिणामी शासनाने जकात कायदा रद्द केला़ मात्र त्याहीपेक्षा जाचक व्यापाऱ्यांना वेठीस धरणारा स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी लागू केला़ या दोन्ही करास विरोध असल्याचे व्यापारी महासंघाने स्पष्ट केले़ एलबीटीला विरोध सुरु असताना ऐन निवडणूकीच्या तोंडावर एलबीटी ऐवजी पुन्हा जकात आकारण्याचा निर्णय तुघलकी असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली़ व्यापाऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर शासनाने अवलंबिलेल्या टोलवा टोलवीच्या धोरणाचा निषेध करत शहरातील व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत़ याबाबात चर्चा करण्यासाठी व्यापारी महासंघाने शनिवारी बैठक बोलावली आहे़ व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता जकात कायदा लागू केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे़ (प्रतिनिधी)
एलबीटी नको अन् जकातही
By admin | Updated: August 15, 2014 00:06 IST