शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकही चारा छावणी बंद पडणार नाही

By admin | Updated: February 22, 2016 00:23 IST

भूम : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची जनावरे जगविण्यासाठी यापुढे चारा छावण्यांची नितांत आवश्यकता आहे़ हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून

भूम : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची जनावरे जगविण्यासाठी यापुढे चारा छावण्यांची नितांत आवश्यकता आहे़ हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, कोणत्याही परिस्थितीत एकही चारा छावणी बंद पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले़भूम शहरानजीकच्या वडमाऊली महिला दूध संस्थेच्या चारा छावणीला बागडे यांनी शनिवारी भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला़ यावेळी ते बोलत होते़ बागडे म्हणाले, मी एक शेतकरी असल्याने दुष्काळात शेतकऱ्यांना पशुधन जगविताना किती अडचणी येतात याची माहिती आहे़ चाऱ्याअभावी पशुधनाची विक्री होवू नये, यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत़ भूम तालुक्यात सर्वाधिक चारा छावण्या असून, जवळपास ४३ हजार पशुधनाला चारा मिळत आहे, ही समाधानकारक बाब आहे़ जनावरांना चारा देताना विशेष काळजी घ्यावी, चारा वाया जाणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे़ मध्यंतरी चारा छावण्या बंद होणार असल्याचे संकट शेतकऱ्यांसमोर आले होते़ मात्र, हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे़ येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी छावण्यांची आवश्यकता आहे़ त्यामुळे छावण्या बंद होणार नाहीत, असेही बागडे यांनी सांगितले़ कार्यक्रमास भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अ‍ॅड़ मिलिंद पाटील, बाळासाहेब क्षीरसागर, आ़ राहूल मोटे, माजी जिप अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अंगद मुरूमकर, सेना तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, जिल्हा उपप्रमुख दिलीप शाळू, आऱडी़सूळ, काकासाहेब चव्हाण, हनुमंत पाडुळे, सोपान वरवडे, शेतकरी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते़