शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

नशेबाजांना बाभुळवाडीमध्ये ‘नो एंट्री’ !

By admin | Updated: August 20, 2016 00:55 IST

संजय तिपाले , बीड ‘गाव करील ते राव करील काय?’ ही म्हण प्रसिद्ध आहे. तिचा तंतोतंत प्रत्यय तालुक्यातील बाभुळवाडीत आला आहे. तोंडाच्या कर्करोगाने एका कुटुंबाने एकुलता एक कर्ता तरुण गमावला

संजय तिपाले , बीड‘गाव करील ते राव करील काय?’ ही म्हण प्रसिद्ध आहे. तिचा तंतोतंत प्रत्यय तालुक्यातील बाभुळवाडीत आला आहे. तोंडाच्या कर्करोगाने एका कुटुंबाने एकुलता एक कर्ता तरुण गमावला. जिवावर उठलेल्या व्यसनाला हद्दपार करण्यासाठी अख्खे गाव उभे राहिले अन् स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नशेबाजांना गावात प्रवेश न देण्याच्या ठरावावर शिक्कामोर्तब झाले. झिंगाट होणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी समितीही नेमली असून दंडही केला जाणार आहे.सव्वाशेवर उंबरे व दीड हजार लोकसंख्येच्या बीड तालुक्यातील बाभुळवाडीने व्यसनाविरुद्ध केलेला हा उठाव सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गावात दारुचे अधिकृत दुकान नाही; परंतु चोरीछुपे विक्री सुरु होती. गुटख्याचेही तेच. बंदी असताना किराणा दुकानांतही तो सहज उपलब्ध व्हायचा. त्यामुळे तरुणांपासून ते वृद्धापर्यंत साऱ्यांनाच तंबाखू, सिगारेट, विडी व गुटख्याचा चटका लागला होता. लक्ष्मण रामदास सातपुते हा ३२ वर्षाचा एकुलता एक तरुण मुखकर्करोगाने गेला. जिवावर उठलेल्या व्यसनाला कायमचे हद्दपार करण्याची संकल्पना सरपंच परमेश्वर सातपुते यांनी मांडली, ती गावानेही उचलून धरली. त्यानंतर तंबाखू, विडी, सिगारेट, गुटख्याची होळी करण्यात आली. महिलांनी उत्स्फूर्तपणे या निर्णयाचे स्वागत केले. व्यसन करणार नाही, अशी शपथही गावकऱ्यांनी घेतली. यावेळी ग्रा.पं. सदस्या हौसा सातपुते, रेखा खटाणे, शकुंतला जाधव, वंदना मोरे, चंपा मोरे, राघोजी सातपुते, मुख्याध्यापक प्रकाश आहिरे, ग्रामसेवक यू. के. साळवे, तंटामुक्ती अध्यक्ष सुदाम सातपुते हे उपस्थित होते.व्यसने करणाऱ्यांसह घातक उत्तेजक पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केरबा मातकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यसनमुक्ती समिती गठित करण्यात आली. यात लक्ष्मण सातपुते, ज्ञानोबा सातपुते, नारायण सातपुते, गोरख भटे, रमेश जाधव, राम सातपुते, सखाराम सातपुते, बंडू सातपुते, जालिंदर सातपुते यांचा समावेश आहे.