शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी नाही, खोटे गुन्हे दाखल केले

By admin | Updated: June 12, 2017 00:31 IST

औरंगाबाद :राजकीय हेतूने आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र सहकार संस्था कायद्यातील तरतुदीनुसार ५२ सहकारी सोसायट्यांच्या ८ कोटी ५२ लाख रुपयांच्या कर्जाचे निर्लेखन केलेले आहे. या सोसायट्यांना बँकेने कर्जमाफी दिलेली नसून त्यांच्याकडील कर्जवसुलीसाठी ४९ सोसायट्यांविरुद्ध न्यायालयात दावे दाखल केलेले आहेत, असे असताना राजकीय हेतूने आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. मर्जीतील ५२ सोसायट्यांना बेकायदा ८ कोटी ५२ लाख रुपयांची कर्जमाफी दिल्याप्रकरणी अ‍ॅड. सदाशिव गायके यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेत जबाब नोंदविल्यानंतर आ. सत्तार यांनी रविवारी दुपारी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, संचालक मंडळाने बँकेच्या हितासाठी ५२ सहकारी सोसायट्यांचे ८ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज निर्लेखन केले. निर्लेखन म्हणजे कर्जमाफी नाही.याविषयी तक्रारदार गायके यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहकार निबंधक आणि ग्रामीण पोलिसांनीही चौकशी केली होती. शिवाय शहर गुन्हे शाखा दोन वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी करीत आहे; मात्र आताच हा गुन्हा का दाखल करण्यात आला. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यशस्वी झाले. यामुळे भाजपने राजकीय हेतूने आम्हाला बदनाम करण्यासाठी ठरवून गुन्हे नोंदविले. औरंगाबादसह राज्यातील सर्वच बँकांनी अशाप्रकारे बुडीत सोसायट्यांचे कर्ज निर्लेखन केलेले आहे. असे असताना केवळ औरंगाबादेतच गुन्हे कसे नोंदविले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. औरंगाबादेतील बँकेच्या संचालक ांविरुद्ध ज्या आरोपाखाली गुन्हे नोंदविले, तसेच गुन्हे राज्यातील अन्य जिल्हा सहकारी बँकांच्या संचालक मंडळाविरुद्धही नोंदवावेत, यासाठी आमचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार करणार असल्याचे आ. सत्तार म्हणाले.