शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील वेतन घोटाळ्याची ना चौकशी ना कारवाई

By admin | Updated: September 15, 2015 00:24 IST

संजय तिपाले , बीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात नियमबाह्य आंतरजिल्हा बदल्यांनी उडालेला धुराळा आणखी जमिनीवर नीट टेकलाही नाही तोच वेतन घोटाळा समोर आला आहे.

संजय तिपाले , बीड जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात नियमबाह्य आंतरजिल्हा बदल्यांनी उडालेला धुराळा आणखी जमिनीवर नीट टेकलाही नाही तोच वेतन घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश सीईओ नामदेव ननावरे यांनी दिले होते; परंतु अधिकाऱ्यांनी या आदेशाला सोयीस्करपणे बाजूला ठेवून घोटाळेबाजांची पाठराखण केली आहे. जिल्ह्यात शिक्षकांची मंजूर पदे कमी अन् शिक्षक जादा यामुळे वेतनाचा तिढा निर्माण झाला होता. पदस्थापनेअभावी वर्ष, दीड वर्षांपासून आठशेवर शिक्षक वेतनाविना आहेत. शिक्षकांच्या वेतनासाठी मे २०१४ पासून शालार्थ आॅनलाईन प्रणाली अवलंबली जाते. मात्र, अतिरिक्त ठरलेल्या काही शिक्षकांनी दलालांना हाताशी धरुन पदस्थापना, संचमान्यता नसताना बेकायदेशीरपणे वेतन उचलले. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवरही ‘अतिरिक्त’ बोजा पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे वेतन नियमबाह्य काढून देण्यासाठी मोठी साखळीच कार्यरत होती. टक्क्याची भाषा बोलत काही गटशिक्षणाधिकाऱ्यांनीही अतिरिक्त शिक्षकांचे नियमबाह्य वेतन काढण्यास ‘हातभार’ लावला. कारण गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनेच बिले अंतिम मंजुरीसाठी जातात. सीईओ नामदेव ननावरे यांनी २७ आॅगस्ट रोजी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून खुलासे, वेतनआदेशाच्या ‘हार्डकॉपीज’ मागविल्या होत्या;परंतु मुदत उलटूनही त्यांच्या पत्राला उत्तर नाही. असा केला घोटाळा.. मुख्याध्यापक, बीईओंना स्वतंत्र डीडीओ कोेड दिले आहेत. या कोडची गोपनियता राखणे आवश्यक होते;परंतु हा कोड ‘लिक’ झाला. त्याआधारे परस्पर पदस्थापना नसतानाही शिक्षकांची नेमणूक रिक्तपदी दाखवून अतिरिक्त असलेल्या काळातील वेतन उचलण्यात आले. काहींनी आपल्या जवळच्या नातेवाईक शिक्षकाला मुद्दाम रजेवर पाठवून त्याजागी स्वत:ची नेमणूक दाखवत वेतन उचलले. हा घोटाळा कोटीच्या घरात असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. घोळवेंचा चौकशीस नकार शिक्षण विभागातील वेतन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश सर्व शिक्षा अभियानचे लेखाधिकारी सतीश घोळवे यांना दिले होते. घोळवे यांची जालना येथे वेतन पथकात बदली झालेली आहे. ते सर्व शिक्षा अभियानमध्ये प्रभारी आहेत. त्यांनी चौकशी करण्यास नकार दिला. त्यामुळे सीईओंपुढे नवाच पेच निर्माण झाला आहे.