शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत मंझाविरोधात आणखी नऊ जणांच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:28 IST

नोकरीला लावण्याच्या आमिषाने ३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्वर मंझाविरुद्ध आणखी ९ तक्रारी बुधवारी पोलिसांना प्राप्त झाल्या. यावरून आरोपीचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विटखेडा येथील त्याच्या अलिशान बंगल्याची पोलिसांनी झडती घेतली.

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे : विटखेड्यातील बंगल्याची झडती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नोकरीला लावण्याच्या आमिषाने ३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्वर मंझाविरुद्ध आणखी ९ तक्रारी बुधवारी पोलिसांना प्राप्त झाल्या. यावरून आरोपीचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विटखेडा येथील त्याच्या अलिशान बंगल्याची पोलिसांनी झडती घेतली.देवनाथ माणिकराव चव्हाण (रा. चिकलठाण, ता. कन्नड) यांच्या भावाला विद्यापीठात सहायक कारकून म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेतल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मंझाला मंगळवारी अटक केली. सध्या तो २४ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे. ईश्वर मंझा हा बेरोजगारांना नोकरीला लावण्याच्या आमिषाने गंडवितो, अशा तक्रारींची चर्र्चा विद्यापीठ परिसरात होत असे. फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्यास अटक केल्याचे कळताच बुधवारी आणखी नऊ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेऊन मंझाचे कारनामे सांगितले. यापैकी सहा जणांच्या एका गटाने मध्यस्थांमार्फत आरोपी मंझाला नोकरीसाठी पैसे दिल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांना सांगितले. ते म्हणाले की, अन्य दोन तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत येऊन मंझाने फसविल्याचे सांगितले. या तक्रारदारांना त्यांच्याकडील कागदपत्रांसह येण्यास सांगण्यात आले आहे. आरोपीचा विटखेडा येथील भूखंड क्रमांक ५० वर अलिशान बंगला आहे. कालच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्या बंगल्याची पोलिसांनी झडती घेतली. सुमारे तीन तास चालेल्या या झडतीत विशेष असे काही पोलिसांच्या हाती लागले नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.