शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या ९ जि़प़ सदस्यांचे राजीनामे

By admin | Updated: September 28, 2014 23:51 IST

नांदेड : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या नऊ सदस्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत़

नांदेड : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या नऊ सदस्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत़ जि़प़ च्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीत आपले म्हणणे ऐकून न घेता काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची नावे जाहीर केल्याचा आरोप या नऊ सदस्यांनी केला आहे़ जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहनराव पाटील टाकळीकर, मारोतराव कवळे, पांडुरंग गायकवाड, रमेश सरोदे, डॉ़ मीनाक्षी कागडे, सुरेखा कदम, नंदाताई पवार, कमलबाई पाटील आणि ललिता चिंतलवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत़ याबाबत जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांनाही कळविण्यात आले आहे़ उपरोक्त सदस्यांनी वेळोवेळी दुटप्पीपणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे़ २१ सप्टेंबर रोजीच्या जि़ प़ अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही उमेदवार निवडीत म्हणणे ऐकून घेतले नाही़ आघाडी धर्माप्रमाणे गत अडीच वर्षांत सर्वांना समान पदे व सन्मान मिळाला पाहिजे, अशी भूमिका असल्याचे सांगत जि़प़ सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचे राजीनामे देत असल्याचे या नऊ सदस्यांनी पत्रात नमूद केले आहे़ दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही या गटाने पत्र देत राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत ब गट म्हणून सभागृहात बसण्याची परवानगी या नऊ सदस्यांनी केली होती़ या नऊ सदस्यांनी जि़प़ अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना मदत केली असली तरी पक्षावरील नाराजी मात्र त्यांनी व्यक्त केली आहे़ जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांनाही या निवडणुकीत विचारात घेतले नसल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला़जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांना पक्षाच्या नऊ सदस्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारले असता पक्षातील वरिष्ठांनीच या पदासाठी आपले नाव सूचविले असल्याचे सांगितले़ पक्ष निरीक्षक दांडेगावकर यांनी सर्व सदस्यांची मते विचारात घेतली होती़ २० सप्टेंबर रोजी बैठकही झाली होती़ त्यांची नाराजी दूर करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना उपाध्यक्ष धोंडगे यांनी हा पक्ष पातळीवरील विषय असून आपण त्यावर काही बोलू शकत नसल्याचे सांगितले़ (प्रतिनिधी)