शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याच्या शुद्धीकरणाचे ‘पेटंट’ आगळे, सदगीर यांंना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक व इको निड्‌स फाउण्डेशनचे संस्थापक डॉ. प्रियानंद आगळे व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तत्कालीन प्रा. ...

औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक व इको निड्‌स फाउण्डेशनचे संस्थापक डॉ. प्रियानंद आगळे व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तत्कालीन प्रा. डॉ. पराग सदगीर यांनी रसायन, वीज व कोणत्याही यंत्राशिवाय सांडपाण्याचे शुद्धीकरण करता येते, अशी संशोधनाद्वारे पद्धत विकसित केली असून, त्यांच्या संशोधनाला भारत सरकारचे ‘पेटंट’ जाहीर झाले आहे.

प्रदूषित होत असलेल्या नद्या व जलसंपदा वाचविण्यासाठी तसेच सामान्य जनतेला स्थानिक साधनांचा सहज वापर करून सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी ही पद्धत वापरता येणार आहे. अल्प जागा व अल्प खर्चात घरगुती सांडपाणी, संस्थात्मक सांडपाणी, नद्या, नाले, शहर, गाव पातळीवरील सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा वापर करणे शक्य होणार आहे. यावर डॉ. आगळे यांच्या संशोधनावर भारत सरकारने २६ एप्रिल रोजी ‘जागतिक बौद्धिक संपदा हक्क दिनी’ शिक्कामोर्तब केले आहे.

प्रा. आगळे यांनी ‘सेल्फप्युरिफिकेशन बेस्ड पोल्युटेड वॉटर प्युरिफिकेशन’ या विषयावर डॉ. सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. केली. पीएच.डी.ला सुरुवात करण्याअगोदरच त्यांनी या विषयाचे ‘पेटंट’ मिळण्यासाठी सन २०१६ मध्ये भारत सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. परवा या विषयावर कोलकाता येथील बौद्धिक संपदा विभागाने डॉ. आगळे व डॉ. सदगीर यांची ‘ऑनलाइन’ मुलाखत घेतली व ‘पेटंट’ जाहीर केले.

या पद्धतीच्या माध्यमातून सांडपाण्यातील बीओडी ९० टक्के, फॉस्फरस ७७ टक्के, नायट्रेट ९३ टक्के, अमोनिया ९० टक्के, ऑइल अँड ग्रीस ८२ टक्के कमी करण्यास मदत होत असल्याचे सिद्ध झाले आहे.