शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:02 IST

औरंगाबाद: कामावरून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला तीन जणांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील १ हजार ४६० रुपये ...

औरंगाबाद: कामावरून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला तीन जणांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील १ हजार ४६० रुपये हिसकावून घेतले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कॉन्स्टेबलच्या मोटारसायकलवर दगड घालून नुकसान केले. आरोपी त्यानंतर दुचाकीवर बसून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या काही तासात एका आरोपीला अटक केली.

नितीन भास्कर वक्ते (वय ३०), गौतम राम कदम (४०) आणि दीपक रमेश वक्ते (तिघे रा. संसार नगर ) अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मुळे पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. थर्टी फर्स्टचा बंदोबस्त ते सूतगिरणी चौकात राखीव अंमलदार म्हणून करीत होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास मुळे हे त्यांची मोटरसायकल घेऊन नंदनवन कॉलनीतील घराकडे अदालत रोड मार्गे जात होते. दोन वाजेच्या सुमारास जीवन विमा कार्यालयाजवळ त्यांच्यामागून आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी त्यांना थांबविले. दुचाकीवरून उतरलेल्या आरोपींनी अचानक त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्याने त्यांचे दोन्ही हात मागून पकडले. तिसऱ्याने मुळे यांच्या खिशातील रोख १ हजार ४६० रुपये बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. मुळे यांनी यांचा प्रतिकार करताच दुसऱ्या आरोपीने दगड उचलून त्यांच्या कानाजवळ मारला आणि खाली पाडले. यात मुळे जखमी झाले. यावेळी त्यांचे पैसे लुटारुंनी हिसकावून घेतले. अन्य एकाने त्यांच्या दुचाकीवर दगड घालून दुचाकीच्या मडगार्डचे नुकसान केले. यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पसार झाले. खाली पडल्यामुळे यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्ष आणि सपोनि घनशाम सोनवणे यांना फोन करून घटनेची माहिती कळविली. दुचाकीचा क्रमांक त्यांनी पाहिला होता.

चौकट

आरोपींना अटक

गस्तीवरील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला असता संसारनगरात आरोपी नितीनला पोलिसांनी पकडले. त्याने उर्वरित आरोपींची नावे सांगितली. त्यापैकी एकजण जालना येथे पळून गेला. तर दुसरा घरात लपून बसला आणि स्वतः एसपीओ असल्याचे पोलिसांना आतून सांगायचा. मात्र, तो दार उघडत नव्हता. त्यावेळी गल्लीत लोकांची गर्दी झाल्यानंतर पोलीस तेथून निघून गेले.