शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तीन राज्यांतून नवीन गव्हाची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2016 01:05 IST

औरंगाबाद : मध्यप्रदेशपाठोपाठ राजस्थान व गुजरात राज्यांतील नवीन गहू स्थानिक बाजारात दाखल झाला आहे. मागील हंगामापेक्षा यंदा गव्हाची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून आले.

औरंगाबाद : मध्यप्रदेशपाठोपाठ राजस्थान व गुजरात राज्यांतील नवीन गहू स्थानिक बाजारात दाखल झाला आहे. मागील हंगामापेक्षा यंदा गव्हाची गुणवत्ता चांगली असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अवकाळी पावसाचा फटका न बसल्याने गव्हाळ रंगदार गहू बाजारात पाहण्यास मिळत आहे. वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी बाजारात पाऊल ठेवल्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात नवीन गहू, ज्वारी, तांदूळ, डाळींच्या सर्व व्हरायटी विक्रीला आल्या आहेत. आता वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांनीही धान्य खरेदीसाठी मोंढ्यात व जाधववाडीत गर्दी करणे सुरूकेले आहे. मागील आठवडाभरात तीन राज्यांतून मिळून सुमारे १८०० ते २ हजार टन गव्हाची आवक झाली. मागील हंगामात ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस झाल्याने गव्हाची प्रत खराब झाली होती. दाण्याचा रंग फिका पडला होता. गव्हाचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, यंदा दुष्काळामुळे गव्हाचे उत्पादन १२ ते १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. यंदा अवकाळी पाऊस पडला पण मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनी आधीच गहू काढून ठेवल्याने या पावसाचा परिणाम जाणवला नाही. सध्या मध्यप्रदेशातून गव्हाळ रंगदार गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गहू क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी महागला आहे. मध्यप्रदेशातील लोकवन गहू १८७५ ते २१५० रुपये, बन्सी गहू २१०० ते २२५० रुपये, मिनी शरबती २००० ते २२०० रुपये, तर शरबती गहू २२५० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. राजस्थानचा शरबती गहू २०५० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल विकल्या जात आहे. गुजरातचा तुकडी गहू २००० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. दरवर्षी राजस्थान व गुजरातहून येणारा नर्मदा गहू येथे आणून विकणे परवडत नसल्याने व्यापाऱ्यांनी तो गहू मागविला नाही.ज्वारी व बाजरीची आवक अचानक कमी झाल्याने क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारी २१०० ते २६५० रुपये क्विंटल विक्री होत आहे. ज्वारीला मागणी कमीच आहे. जिथे २० क्विंटल गहू विकला जातो तेव्हा १ क्विंटल ज्वारी विकल्या जात आहे. खारुड्यासाठी बाजरीला मागणी वाढली आहे. परिणामी बाजरी १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे.