शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा नवा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:45 IST

कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.राज्य शासनाने शेतकºयांसाठी विविध निकष घालून कर्जमाफीची घोषणा केली. त्याला अडीच महिने उलटूनही अद्याप लाभ मिळालाच नसून सदर योजनेत रोजच नवनव्या नियम व अटींची भर पडू लागली असून शासनाने घालून दिलेल्या विविध बाबींची पूर्तता करण्यातच शेतकरी हैराण झाला आहे. सेतू केंद्रावर कर्ज घोषणापत्र आॅनलाईन दाखल करण्याची अट शासनाकडून टाकल्यामुळे सेतू केंद्रावर मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच वारंवार इंटरनेट कनेक्टीव्हिटी खंडित होत असून वेबसाईड हँग होत असल्याने व्यत्यय निर्माण होत आहे. दिवसभर रांगेत उभे टाकुनही अर्ज दाखल होत नसल्याने शेतकºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज घोषणापत्र दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते पुस्तक असणे गरजेचे केले असल्याने शेतकºयांना यासाठी पायपीट सहन करावी लागत आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून निर्माण होणाºया विविध अडचणीमुळे शेतकºयांची भलतीच तारांबळ उडत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी एकीकडे मोठा गोंधळ सुरू असताना आता बँकेमध्येसुद्धा कर्जमाफीच्या फॉर्मसह आॅनलाईन अर्ज दाखल केल्याची पावती, कर्ज खात्याची व बचत खात्याचे पासबूक पत्र, आधार कार्ड, सातबारा, होल्डींग, मयत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र दाखल करण्याचा नवा फतवा शासनाने काढला आहे. गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत १३ सप्टेंबर रोजी दुपारी बँकेत अर्ज आणि कागदपत्रे दाखल करण्याचा फलक लावला असून त्यावर १६ सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याचे नमूद आहे. केवळ तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे. शासनाकडून लादण्यात येणाºया नवनव्या निर्णय व अटीमुळे पुन्हा अडचण निर्माण झाल्याने शासनाकडून घोषणा करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान की अवमान योजना ? असा सवाल व्यक्त करीत शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.याबाबत बँक शाखाधिकारी मनीष कुमार झा यांना विचारले असता ते म्हणाले, वरिष्ठांकडून बँकेमध्ये कर्ज माफीचे अर्ज आणि कागदपत्रे दाखल करून घेण्यास सांगण्यात आले आहे. यावरून कर्जमाफीसाठी यादी शासनाकडे सादर करावयाची असून याद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. मुदतीत अर्ज कागदपत्रे दाखल करण्याचे अवाहन त्यांनी केले.