शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तांची चांदी; नवीन लोकांना संधीच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:26 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सेवानिवृत्त झालेले बहुतांश प्राध्यापक विविध पदांवर कार्यरत आहेत. युवा प्राध्यापकांना संधी देण्यात येत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सेवानिवृत्त झालेले बहुतांश प्राध्यापक विविध पदांवर कार्यरत आहेत. युवा प्राध्यापकांना संधी देण्यात येत नाही. प्राध्यापकांच्या रिक्त जागांनी शंभरी ओलांडली. शिक्षकेतर कर्मचा-यांमध्येही २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. याच वेळी विद्यापीठात कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांचा आकडा ६४५ पेक्षा अधिक झाला आहे. नियोजनाच्या अभावामुळे मागील साडेतीन वर्षांत एकही जागा भरलेली नाही, हे विशेष.विद्यापीठात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात अनेक वेळा कुलसचिव, परीक्षा संचालक, वित्त व लेखाधिका-यांसह प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. मात्र या जागा काही भरण्यात आलेल्याच नाहीत. विद्यापीठात सद्य:स्थितीला प्राध्यापकांची २८९ पदे मंजूर आहेत. यात ३० पदे विद्यापीठ फंडातून भरण्यात आलेली आहेत. त्या पदांचेही राज्य सरकारने दायित्व स्वीकारले असून, विद्यापीठ प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे त्या पदांचा निधी मिळालेला नाही. यातच प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा आकडा १०५ पेक्षा अधिक झाला आहे. राज्य सरकारने नोकरभरतीवर बंदी घातल्यामुळे ही पदे भरता येणार नाहीत. नोकरभरतीवरील बंदी उठण्याची शक्यता सद्य:स्थितीत नसल्यामुळे हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याच वेळी विद्यापीठात सप्टेंबर २००९ च्या आकृतिबंधानुसार शिक्षकेतर कर्मचा-यांची ७७७ पदे मंजूर आहेत. यातील केवळ ५१० कर्मचारी सध्या कार्यरत असून, उर्वरित पदे रिक्त आहेत. या पदात वर्ग-१ ची ५४ पदे मंजूर आहेत. यात केवळ २६ पदे भरलेली आहेत. यापैकी दोन जण लीनवर गेलेले आहेत. तर विद्यापीठात ४६५ कंत्राटी कर्मचारी, १२० सुरक्षारक्षक आणि ६० स्वच्छता कर्मचारी कंत्राटी पद्धतीवरच कार्यरत आहेत. हा एकूण आकडा ६४५ पेक्षा अधिक आहे. या सर्व कंत्राटी कर्मचाºयांना विद्यापीठ फंडातून वेतन देण्यात येते. मागील साडेतीन वर्षांत शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यात आली असती, तर विद्यापीठ फंडाचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला असता हे नक्की. यातच राज्य सरकारने नोकरभरतीवर बंदी घालताना सुधारित आकृतिबंध सादर करण्याचे आदेश दिले होते.विद्यापीठ प्रशासनाने हा आकृतिबंध सादर करण्यासही विलंब केला होता. प्रशासनाची दयनीय अवस्था असताना कुलगुरूंना याकडे लक्ष देण्यासही वेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.अनेक विभाग प्राध्यापकांविनाविद्यापीठातील अनेक विभागांत एकही प्राध्यापक कार्यरत नसल्याचे दिसून आले.या एकही प्राध्यापक नसलेल्या विभागांमध्ये उदार कला, नॅनो टेक् नॉलॉजी, म्युझिक, योगा, नृत्यशास्त्र, पाली अ‍ॅण्ड बुद्धिझम अशा अनेक विभागांचा समावेश आहे. तर केवळ एकच प्राध्यापक असणाºया विभागांमध्ये भूगोल, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, परकीय भाषा अशा विभागांचा समावेश आहे. या सर्व अभूतपूर्व शिक्षक टंचाईवर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाने १६ प्राध्यापकांची २४ हजार रुपये मानधनावर ११ महिन्यांसाठी नेमणूक करण्यासाठी शुक्रवारी जाहिरात काढली आहे. हा प्रकार म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखाच आहे.