शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दयानंद कांबळे विद्यापीठाचे नवीन प्रभारी क्रीडा संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 21:12 IST

अनेक आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पंच म्हणून यशस्वीपणे कामगिरी बजावणारे तसेच या खेळाचे एनआयएस प्रशिक्षक डॉ. दयानंद कांबळे यांनी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या क्रीडा संचालकाचा पदभार आज दुपारी ४.३० वाजता स्वीकारला.

औरंगाबाद : अनेक आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पंच म्हणून यशस्वीपणे कामगिरी बजावणारे तसेच या खेळाचे एनआयएस प्रशिक्षक डॉ. दयानंद कांबळे यांनी गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या क्रीडा संचालकाचा पदभार आज दुपारी ४.३० वाजता स्वीकारला.१ नोव्हेंबर रोजी डॉ. प्रदीप दुबे यांनी विद्यापीठाच्या क्रीडा संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तब्बल दोन आठवडे पद रिक्त होते. त्यामुळे खेळाडूंना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले होते. एवढेच नव्हे तर उंबरठ्यावर आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा असतानाही हा संघ सहभागी होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. अखेर यात एका क्रीडा संचालकाने स्वत:च्या जबाबदारीवर या स्पर्धेसाठी लागणारा खर्च घेतल्यामुळे विद्यापीठाचा बॉक्सिंग संघ चंदीगड येथे १८ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे. प्रदीप दुबे यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी कुलगुरूंना निवेदन देऊन या पदावर स्थानिक महाविद्यालयातील क्रीडा संचालकाची नियुक्ती करावी याविषयी निवेदनही दिले होते. त्यानंतरही लवकर निर्णय घेण्यात आला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी डॉ. दयानंद कांबळे यांच्यासह याआधी प्रभारी क्रीडा संचालकपद भूषवणारे डॉ. उदय डोंगरे, मौलाना आझाद येथील डॉ. एम.ए. बारी, विवेकानंद महाविद्यालयाचे डॉ. गोविंद कदम हेदेखील शर्यतीत होते; परंतु अखेर डॉ. दयानंद कांबळे यांच्या नावावर कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी दुपारी १.३० वाजता आज शिक्कामोर्तब झाले. प्रदीप दुबे हे क्रीडा संचालक असताना त्यांनी तब्बल १२ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून बंद पडलेला आॅलिम्पिक आकाराचा स्विमिंग पूल सुरू करण्यात विशेष पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले होते. तसेच अनेक आंतरमहाविद्यालयीन व आंतरविद्यापीठ स्पर्धेचीही यशस्वीपणे आयोजन केले होते. तसेच त्यांच्या काळात विद्यापीठाच्या कबड्डी, बॅडमिंटन व बास्केटबॉल संघाने विशेष कामगिरी केली होती; परंतु आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी संघ पाठवण्यास अग्रिम रक्कम घेण्यापासून ते संघ पाठविण्यापर्यंत अनेक अडथळे येत असल्यामुळे त्यांनी अखेर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.आता विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या क्रीडा संचालकाचा पदभार स्वीकारणारे डॉ. दयानंद कांबळे हे अ‍ॅथलेटिक्स खेळातील एनआयएस प्रशिक्षक आहेत. तसेच त्यांनी २०१० साली दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तांत्रिक पंच आणि याचवर्षी ओडिशा येथे झालेल्या एशियन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तांत्रिक पंच म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पेलली आहे. तसेच त्यांच्या स्पर्धा आयोजित करणे व त्या यशस्वीपणे पार पाडणे याचे कौशल्यही त्यांच्यात आहेत.