शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवा बायपास, पुलासाठी निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:59 IST

स्थानिक प्रशासनाने गतीने भूसंपादन केल्यास याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यावर राज्य शासनाचे विशेष लक्ष असून, जिल्ह्यात रस्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करण्यासाठी आतापर्यंत पाच हजार ४०० कोटींचा निधी दिला आहे. शहराची वाढती हद्द लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच नवीन बायपास रस्ता मंजूर केला जाईल. स्थानिक प्रशासनाने गतीने भूसंपादन केल्यास याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले.जालना येथील वृंदावन हॉलमध्ये शहरातील सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व विकास परिषद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आ. विलास खरात, कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, संतोष सांबरे, आयसीटीचे कुलगुरु डॉ. जे.डी. यादव, उद्योजक घनश्याम गोयल, सुरेंद्र पित्ती, किशोर अग्रवाल, राजू बारवाले, मनोज पांगारकर, महेश शिवणकर, सुनील रायठठ्ठा, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उद्योजक राजेंद्र बारवाले, सुरेश अग्रवाल, अर्जुन गेही, सतीश अग्रवाल, राजेश सोनी, धीरेन मेहरा, आशिष मंत्री, रितेश मिश्रा, डी.बी. सोनी, आशिष भाला, नितीन काबरा, डॉ. सुुभाष अजमेरा, हेमंत ठक्कर, रमेश तवरावाला, सतीश पंच, विनित सहानी आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री म्हणाले की, जालना जिल्ह्यासह शहराचा रस्ते विकास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भुयारी गटार योजना इ.साठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रस्तेविकासासाठी जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या माध्यमातून जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात येत आहे. नवीन जालना व जुना जालना शहराला जोडणारा उड्डाणपूल तसेच शहरासाठी आवश्यक असलेल्या बाह्यवळण रस्त्याचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. रसायन तंत्रज्ञान संस्था (आयसीटी) जालना शहरामध्ये होत आहे. येथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.औरंगाबाद येथील दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉरचा सर्वात जास्त फायदा औरंगाबाद व जालना शहराला होणार आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत शेंद्रा-बिडकीन येथे इंडस्ट्रीयल स्मार्ट सिटीचा पहिला फेज पूर्ण करण्यात येणार आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधांची उभारणी झाल्यास अनेक उद्योगधंदे येणार आहेत. शहरापासून जवळच असलेल्या दरेगाव परिसरात ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत आहे. यामुळे शेतक-यांसह उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगला भाव मिळण्याबरोबरच बेरोजगारांना काम मिळणार आहे. येथे होत असलेल्या सीड पार्कच्या माध्यमातून ४० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.शहरातील सिमेंट रस्त्याच्या कामांचे महावीर चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले. यावेळी मनोज पांगारकर, नारायण चाळगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, भागवत बावणे, ज्ञानेश्वर ढोबळे, अशोक पांगारकर, चंद्रशेखर मोहरीर, मसूदभाई, अभय करवा, अ‍ॅड. वाल्मिक घुगे, सुनील आर्दड, सुदामराव सदाशिवे, शशिकांत घुगे, अवधूत खडके, अ‍ॅड. विपुल देशपांडे, अ‍ॅड. सतीश तवरावाला, विजय पांगारकर, जिजाबाई जाधव, औदुंबर बागडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.