शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रॅक्टिकल’चा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:25 IST

रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी स्वत: तयार करणे बंधनकारक असते. मात्र, विद्यार्थी संबंधित सत्राचे सर्व प्रात्यक्षिक झेरॉक्स सेंटर, डीटीपी दुकानातून खरेदी करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, पदविका, औषधनिर्माण, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या काही विषयांना ५० गुणांचे प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) असते. हे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी स्वत: तयार करणे बंधनकारक असते. मात्र, विद्यार्थी संबंधित सत्राचे सर्व प्रात्यक्षिक झेरॉक्स सेंटर, डीटीपी दुकानातून खरेदी करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे प्रात्यक्षिक खरेदी करण्यासाठी मुंबई, पुणे येथीलसुद्धा अभियांत्रिकीचे विद्यार्थी औरंगाबादेत येत असल्याचे स्पष्ट झाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा काही दिवसांनंतर होणार आहेत. या परीक्षेपूर्वी तीन विषयांना असणारे ५० गुणांचे प्रॅक्टिकल पूर्ण करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. यात विषयानुसार सर्किट, थेअरी, डायग्राम, इन्स्ट्रुमेंट, इनपुट, आऊटपुट, स्ट्रक्चर, पॉवर डायग्राम, अशा विविध प्रकारचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना लेखी स्वरुपात संबंधित महाविद्यालयांमध्ये तयार करून द्यावे लागते. यासाठी आवश्यक असलेल्या सूचना महाविद्यालयांतील प्राध्यापक विद्यार्थ्यांना देतात. हे प्रॅक्टिकल तयार करण्यासाठी नमुनासुद्धा देण्यात येतो. विद्यार्थी हाच नमुना झेरॉक्स सेंटर, डीटीपी दुकानदारांना देतात. त्यानुसार दुकानदार विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे रेडिमेड प्रॅक्टिकल देतात. या प्रॅक्टिकलचा दर हा प्रतिपेज ५ ते १२ रुपये याप्रमाणे आहे. हा दर पूर्वी ८ ते १५ रुपये होता. विद्यार्थ्यांना कोणतेही कष्ट न करता तीन विषयांचे रेडिमेड प्रॅक्टिकल तीन ते चार हजार रुपयांमध्ये तयार करून मिळते. एका महाविद्यालयातील प्रत्येक सत्रातील किमान १०० पेक्षा अधिक विद्यार्थी रेडिमेड प्रॅक्टिकलच दाखल करतात, अशी माहिती एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. विविध महाविद्यालयांतील हा आकडा काही हजारांमध्ये आहे.अपडेट माहितीचा खजिनातयार प्रॅक्टिल देणा-या दुकानदार, झेरॉक्सवाल्यांकडे सर्व अभ्यासक्रमांची अपडेट माहिती आहे. विद्यार्थ्यांनी त्यांना साहित्य मागण्यापूर्वीच ते सल्ला देतात. त्यात बदल कसा करायचा हेसुद्धा सांगतात, अशी माहिती समोर आली आहे.