लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:ला कमी न लेखता तयारी केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. यासाठी आवश्यक असलेले हार्डवर्क, वेळेचे नियोजन करून योग्य आणि अचूक वाचन केल्यास कोणतीही परीक्षा कठीण नसल्याचे राज्य वस्तू व सेवा कर सहआयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्पष्ट केले.‘लोकमत’तर्फे ‘घडवा तुमचे युनिक भविष्य’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत ‘स्पर्धेच्या जगात’ ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक लेखमाला सुरू केली आहे. डॉ. बाबासाहेब आंंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात या लेखमालेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, जीएसटी सहआयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, ‘लोकमत’चे वितरण व्यवस्थापक प्रमोद मुसळे, विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ. मुस्तजिब खान आणि ‘रासेयो’ संचालक डॉ. टी. आर. पाटील उपस्थित होते. दीपा मुधोळ- मुंडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यूपीएससीची तयारी करताना दुसºया प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली. तरीही निवड झाली नाही. तेव्हा खूप रडले आणि पुन्हा नव्याने तयारी सुरूकेली. त्यानंतर यश मिळाले.सुधीर महाजन यांनी ‘लोकमत’मधील लेखमालेच्या पाठीमागची भूमिका विशद केली. सूत्रसंचालनसंजय शिंदे यांनी केले. आभार डॉ. टी. आर. पाटील यांनी मानले.
स्वत:ला कधीच कमी लेखू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:50 IST