शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:50 IST

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्यामुळे धास्तावलेल्या बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर दिवसभर धरणे आंदोलन दिले. मात्र, त्याठिकाणी एकही सक्षम अधिकारी नसल्यामुळे दिवसभर बिनापाण्याचे बसून राहावे लागल्याचा प्रकार गुरुवारी घडला.

ठळक मुद्देपवित्र पोर्टलमध्ये चुका : हजारो विद्यार्थी उपसंचालक कार्यालयापुढे ताटकळत बसले; प्रशासनाचे दुर्लक्ष

औरंगाबाद : प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्यामुळे धास्तावलेल्या बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर दिवसभर धरणे आंदोलन दिले. मात्र, त्याठिकाणी एकही सक्षम अधिकारी नसल्यामुळे दिवसभर बिनापाण्याचे बसून राहावे लागल्याचा प्रकार गुरुवारी घडला.पवित्र पोर्टलमार्फत शाळांमधील शिक्षक नोकरभरती करण्यात येत आहे. या पवित्रमध्ये मागील काही दिवसांपासून सतत तांत्रिक बिघाड होत आहे. यासाठी अनेक वेळा बेरोजगार संघटनांनी तक्रारी करूनही अर्ज दुरुस्ती झालेली नाही. अर्ज करण्यासाठी शुक्रवारी शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी ज्यांना आॅनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्या सर्व उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात दुरुस्तीसाठी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अर्जातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, नाशिक येथून शेकडो बेरोजगार युवकांनी औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. या कार्यालयात अर्ज दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. हजारो विद्यार्थी कार्यालयाच्या परिसरात अर्ज घेऊन आले होते. मात्र, त्यांना दिवसभर कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी दुपारपासून शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्या कार्यालयाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी या कार्यालयात शिक्षण उपसंचालकासह सहायक उपसंचालक इतर अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे बेरोजगारांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. रात्री ८ वाजेपर्यंतही उमेदवार शिक्षण उपसंचालक कार्यालयात थांबलेले होते. शुक्रवारी शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड घबराट पसरलेली आहे. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या शिक्षक नोकरभरतीमध्ये संधी हुकण्याची भीती या उमेदवारांमध्ये दिसून आली. याविषयी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.चौकट,महिलांना झाला प्रचंड त्रासशिक्षण उपसंचालक कार्यालयात शेकडो महिला उमेदवार आपल्या पाल्यांसह अर्ज दुरुस्तीसाठी आल्या होत्या. या कार्यालयात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे अनेकांना दूरपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागली. दिवसभर कार्यालयाबाहेर बसल्यामुळे उन्हाच्या झळा, गर्मी यामुळे महिलांना अधिक त्रास झाला. यात नांदेडवरून आलेल्या दोन मुस्लिम महिलांना उपवास होता. उन्हामध्ये त्रास सहन करीत बसावे लागल्यामुळे या महिलांना अक्षरश: रडू कोसळले. या आहेत पोर्टलवरील तांत्रिक चुकाशिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना अनेक उमेदवारांचे लॉगिन होत नाही. लॉगिन झाल्यानंतर प्रेफरन्स चुकीचा दाखवला जातो. पासवर्ड मिसमॅच दाखविण्यात येतो. प्रेफरन्स दिल्यास दुसऱ्याच शाळेला दाखविण्यात येतात. ज्या शाळेत एकही रिक्त पद नाही. या सगळ्या चुका घेऊन बेरोजगार उमेदवार दुरुस्तीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल झाले होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeachers Recruitmentशिक्षकभरती