शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू रोड व कादराबाद रस्त्याचे होणार रुंदीकरण

By admin | Updated: March 11, 2017 23:54 IST

जालना : शहरातील नेहरू रोड आणि कादराबाद रस्त्याचे रूंदीकरण होऊन रस्ता पंधरा मिटरचा करण्यात येणार आहे.

जालना : शहरातील नेहरू रोड आणि कादराबाद रस्त्याचे रूंदीकरण होऊन रस्ता पंधरा मिटरचा करण्यात येणार आहे. या संबंधीच निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नुकताच झाला. गत अनेक वर्षांपासून अरूंद असलेले हे रस्ते आता मोकळा श्वास घेणार असून, पालिका प्रशासनाने या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. साधारणपणे ४० वर्षांपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्त्याचे काम सिमेंटमध्ये आहे. सद्यस्थितीत हा रस्ता ९ मीटर रूंद आहे. सराफा तसेच व्यापारी पेठ या मार्गावर असल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडी व गर्दीचे प्रमाण वाढले आहे. रस्ता अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. जर रस्ता रूंद करावयाचा झाल्यास दोन्ही बाजूचे अनेक दुकाने व घरे पडणार आहेत. काही व्यापाऱ्यांचा विरोध तर काहींचे रूंदीकरणाला समर्थन आहे. रूंदीकरण झाल्यास वाहतूूक समस्या निकाली निघेल. व्यापाऱ्यांसह सर्वांनाच रस्त्याचा फायदा होईल. रस्त्याच्या मध्यभागापासून पंधरा मीटर रूंद करणार का अन्य मोजमाप करून करणार याचा नकाशा नगररचना विभागाने केला आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. वेळप्रसंगी मोजमापात फरक होईल, असा अंदाज मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले. कादराबाद रस्त्याचेही रूंदीकरण होणार आहे. कादराबाद रत्याचेही निर्मितीपासून रूंदीकरण झालेले नाही. पाणवेस ते मंगळबाजार दरम्यान हा रस्ता असून, हा रस्ताही १५ मीटर रूंद होणार आहे. शहराचा गत काही वर्षांत आजूबाजूने विकास होत असला तरी शहरातही वाहतूक कोंडीसह इतर समस्या भेडसावत आहे. पाणीवेस, सराफा, अलंकार, सावरकर चौक आदी मार्गांवर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत.