शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोसळण्याच्या बेतातील दोन जलकुंभांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 10, 2014 00:58 IST

वाळूज महानगर : जोगेश्वरी व वाळूज येथील जलकुंभ कोसळण्याच्या बेतात असून, त्याला पाडण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली

वाळूज महानगर : जोगेश्वरी व वाळूज येथील जलकुंभ कोसळण्याच्या बेतात असून, त्याला पाडण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे, तर एमआयडीसीच्या जलकुंभाची दुरवस्था झाली आहे.वाळूज ग्रामपंचायतीला हा जलकुंभ पाडण्यासाठी परवानगी मिळाली असून, जोगेश्वरी ग्रामपंचायत धोकादायक जलकुंभ पाडण्याची परवानगी मिळण्यासाठी जिल्हा परिषद व गंगापूर पंचायत समितीकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सतत पाठपुरावा करीत आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे जलकुंभ पाडण्यास परवानगी मिळत नाही, हे नागरिकांना कळत नाही. हे जलकुंभ नागरी वसाहतीलगतच असल्यामुळे तेथे कायम वर्दळ असते.या जलकुंभांचे स्लॅब मोडकळीस आले असून, त्याला ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. जलकुंभांच्या जिन्याची व पायऱ्यांची दुरवस्था झाली असून, लहान मुले जलकुंभाशेजारीच खेळत असतात. अनेक नागरिक, वाहनधारक जलकुंभाशेजारून ये-जा करतात. आता पावसाळ्यात जलकुंभात पाणी मुरून तो कोसळण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.परवानगी मिळेनाजोगेश्वरीतील धोकादायक जलकुंभ पाडण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग व पंचायत समितीकडे गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. मात्र, जलकुंभ पाडण्यास परवानगी मिळालेली नाही. -योगेश दळवी,सरपंच, जोगेश्वरीलवकरच पाडणार मोडकळीस आलेल्या जलकुंभाजवळ सूचना फलक लावून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जलकुंभापासून लहान मुले व नागरिकांना तेथून दूर जायला कर्मचारी सांगतात. हा जलकुंभ पाडण्यासाठी मंजुरी मिळाली असून लवकरच तो पाडला जाईल.-रंजना भोंड, सरपंच, वाळूज