शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या दुर्लक्षाने बेसुमार वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:52 IST

वन विभागाच्या दुर्लक्षामुळे माहूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. कालच तालुक्यातील माहूर बीटमधील टाकळी मुरली शिवारात अवैधरित्या गैरी लाकडाची वाहतूक करणाºया ट्रकला वनविभागाने सापळा रचून पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे माहूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. कालच तालुक्यातील माहूर बीटमधील टाकळी मुरली शिवारात अवैधरित्या गैरी लाकडाची वाहतूक करणाºया ट्रकला वनविभागाने सापळा रचून पकडले. हा अवैध वृक्षतोडीचा सर्वात मोठा पुरावा आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी हे प्रभारी असल्याने ते उंटावरुन शेळ्या हाकत असून वनपाल व कर्मचाºयांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष माहूरच्या जंगलाचे वाळवंट करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.वनक्षेत्र वाढविण्यासाठीची शासनाची झाडे लावा, झाडे जगवा ही योजना हवेतच विरली आहे. बेसुमार वृक्षतोडीने पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. जिल्ह्यातील एकूण वनव्याप्त क्षेत्रापैकी निम्म्यांहून अधिक क्षेत्र माहूर, किनवट तालुक्यात आहे.माहूुर तालुका हा सह्याद्री पर्वताच्या रागांत मौल्यवान सागवान वृक्षाच्या घनंदाट जगंलानी व्यापला असून तालुक्यात एकूण १३हजार ६१७.९८१ हेक्टरवर वनक्षेत्र असून वनपरिमंडळ ५ आहेत.तालुक्याचे एकूण भोगोलिक क्षेत्र ५१ हजार ७७०.८३ हेक्टर असून त्यापैकी जंगलाखालील क्षेत्र १३ हजार ६१७.९८१ हेक्टरवर सह्याद्री पर्वताच्या घनदाट जंगलभागात मौल्यवान सागवानी वृक्षानी व्यापलेला आहे. तालुक्यातील शेतकºयांनी विना परवाना बांधावरील, माळरानावरील झाडांची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे.अवैध वृक्षतोडीवर सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने वातावरणाचा समतोल राहिला नाही. उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. वातावरण दूषित होऊ लागले आहे. वातावरणात समतोल रहावा म्हणून शासन विविध उपाययोजना करते. १ जुलै रोजी शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमाची जिल्ह्यात माहुरातून पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले गेले. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश गावोगावी पोहोचविण्यात आला, परंतु शासनाची झाडे लागवडीची नोंद कागदावरच आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेत वृक्षलागवड करायची अन् दुसºया बाजूला अवाजवी वृक्षतोडीवर प्रतिबंध घालायचा नाही़ यामुळे जंगलाना वाळवंटाचे स्वरुप प्राप्त होत आहे.माहूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. नरोड यांना विविध कामात भ्रष्टाचार केल्याचा कारणावरुन मागील तीन-चार महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले होते.