शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

विजय मल्ल्यानंतर नीरव मोदी पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:39 IST

लिकर सम्राट विजय मल्ल्यानंतर डायमंड किं ग नीरव मोदीने देशाला बुडवून पळ काढला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सरकार आणि सरकारी बँकांना लगावला. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे आयोजित राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हबच्या १९ व्या राज्यस्तरीय उद्योग मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देउद्योगमंत्र्यांचा टोला : लघु उद्योजक मातीशी जुळलेले आहेत, त्यांना बँकेने सहकार्य करावे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लिकर सम्राट विजय मल्ल्यानंतर डायमंड किं ग नीरव मोदीने देशाला बुडवून पळ काढला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सरकार आणि सरकारी बँकांना लगावला. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे आयोजित राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हबच्या १९ व्या राज्यस्तरीय उद्योग मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.बँकांवर सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे त्यांना सरकारच वठणीवर आणू शकते. कृषी, उद्योगांना मोठे करण्यासाठी बँकांचे सहकार्य मोलाचे ठरणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री देसाई म्हणाले, बँकांना वाटते सामान्य लोक बुडवून पळून जातील हा त्यांचा गैरसमज आहे. हे बुडवणारे लोक नाहीत. बुडवणारे लोक पळून जातात. एकतर अगोदर पळाला, मल्ल्या आणि काल नीरव पळाला. लघु उद्योजक पळणारे नसून ते या मातीशी जुळलेले आहेत. बँकांनी नकारार्थी मानसिकता ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.दोन वर्षांमध्ये शेंद्रा-बिडकीन येथील १० हजार एकर जागेचा विकास होईल. औरंगाबाद, जालना, माजलगाव येथील औद्योगिक क्षेत्रात एमएसएमईच्या उद्योगांसाठी २० टक्के तर एसटी-एससी उद्योगांसाठी १० टक्के भूखंड राखीव ठेवून त्यांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. एमआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक सोहम वायाळ यांनी डीएमआयसीमध्ये होत असलेल्या कामांची माहिती दिली.कियानंतर आॅरिकचा अँकर प्रकल्प ह्योसंगकोरियन कंपनी ‘ह्योसंग’ ही शेंद्र्यामध्ये ३ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे़ आॅरिकसाठी ह्योसंग’ हा अँकर प्रोजेक्ट ठरेल. ई-व्हेईकल क्षेत्रातील परदेशी कंपनी लोम्बोर्गिनी देखील राज्यात मोठी गुंतवणूक करणार आहे, असा दावा उद्योगमंत्री देसाई यांनी केला. हॉटेल ताज विवांता येथे आयोजित महाराष्ट्र एमएसएमई कन्व्हेंशन कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते़ यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, नीरज माढेकर, महावीर लुणावत यांची उपस्थित होते़ महाराष्ट्रामध्ये ई-व्हेईकल उत्पादन क्षेत्रामध्ये लोम्बोर्गिनी ही कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे़ याशिवाय डीएमआयसीमधील शेंद्रा येथे टेक्स्टाईल क्षेत्रातील कोरियन कंपनी ह्योसंग ही कंपनी ३ हजार ४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे़ १०० एकर जागेमध्ये हा प्रकल्प उभारला जाईल. यातून एक हजार जणांना रोजगार मिळेल.