शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची नेरळकर अकॅडमीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:56 IST

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रीडा संकुलावर सुरूअसलेल्या राज्यस्तरीय ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत मुंबई सहारा संघाने नेरळकर अकॅडमीवर मात केली. सहारा मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ७ बाद १५३ धावा ठोकल्या.त्यांच्याकडून राहुल देसाईने २ षटकार व एका चौकारासह ३५, संजय मिश्राने एक षटकार व ४ चौकारांसह ३२ व प्रीतम पाटीलने २२ धावा केल्या.

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रीडा संकुलावर सुरूअसलेल्या राज्यस्तरीय ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत मुंबई सहारा संघाने नेरळकर अकॅडमीवर मात केली. सहारा मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ७ बाद १५३ धावा ठोकल्या.त्यांच्याकडून राहुल देसाईने २ षटकार व एका चौकारासह ३५, संजय मिश्राने एक षटकार व ४ चौकारांसह ३२ व प्रीतम पाटीलने २२ धावा केल्या. नेरळकर अकॅडमीकडून उदय पांडेने १३ धावांत २ गडी बाद केले. आनंद ठेंगे, आदित्य नाईक, अमोल खरात, मझहर पठाण व पंकज फलके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात नेरळकर अकॅडमी संघ १९.५ षटकांत १२४ धावांत सर्वबाद झाले. त्यांच्याकडून उदय पांडेने २३ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ३२ धावा केल्या. सचिन लव्हेरा याने १८ चेंडूंत ३ षटकारांसह २५, मनीष कर्वा याने १८ धावा केल्या. सहारा मुंबईकडून कौस्तुभ भाटेने १२ धावांत ३ गडी बाद केले. महाराष्ट्राचा रणजीपटू अक्षय दरेकर, राहुल देसाई व मानसिंग निगडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुसºया सामन्यात पुणे अ‍ॅडव्होकेट संघाने ग्लास पॉलिश इंडियाविरुद्ध १२७ धावा केल्या. त्यांच्याकडून सुधाकर पाटीलने २५ व ऋषिकेश सोनवणे याने २२ धावा केल्या. तुषार म्हात्रेने १६ धावांत ४ गडी बाद केले. सागर मुळेने ३ व सचिन तवारे याने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात ग्लास पॉलिश इंडिया संघाने विजयी लक्ष्य ११.३ षटकांत ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून रोहित राणे याने २३ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५३, कुणाल नग याने नाबाद ३३ व ओमकार गौरवने २१ धावा केल्या. पुणे संघाकडून नासेर मोमीन व सुशांत बार्शीकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.