शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गरज १५ हजार कोटींची; मिळाले ९५४ कोटी

By admin | Updated: March 19, 2016 01:09 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांकडे बजेटमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील प्

सुनील कच्छवे , औरंगाबाददुष्काळग्रस्त मराठवाड्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांकडे बजेटमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील प्रकल्पांच्या गरजेच्या तुलनेत केवळ ६ टक्केच निधी दिला आहे. मराठवाड्यातील रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण १५ हजार ३८५ कोटी रुपयांची गरज आहे. प्रत्यक्षात बजेटमध्ये ९५४ कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विभागातील सिंचनचे प्रकल्प यंदाही अपूर्णच राहणार आहेत.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत मराठवाड्यात ७२ प्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील काही सिंचन प्रकल्प कितीतरी वर्षांपासून रखडलेले आहेत. आता सततच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येथील पाण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी यंदा तरी अपूर्ण प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; मात्र ती फोल ठरली आहे. राज्य सरकारने संपूर्ण गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासाठी १३६२ कोटी रुपयांची तरतूद केली, पण त्यातील ३७३ कोटी रुपये हे अहमदनगर आणि नाशिक (पान २ वर)गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यासाठी ११९७ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना हा मोबदला मंजूर झालेला आहे.४तो वेळेत न मिळाल्यामुळे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली. त्यावर कोर्टाने सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्च्या व इतर साहित्य जप्तीचे आदेश दिले. आताही महामंडळाला बाराशे कोटींच्या तुलनेत अवघा ५० कोटी रुपये निधी मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळातही अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जप्तीची ही कारवाई सुरूच राहण्याची शक्यता आहे.