शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या डोक्यात सुईचा तुकडा

By admin | Updated: August 13, 2014 00:54 IST

उस्मानाबाद : एका २३ दिवसांच्या मुलीच्या डोक्यात इंजेक्शनच्या सुईचा तुकडा निघाल्याचे गंभीर प्रकरण सोमवारी समोर आले आहे़ मुलीच्या पालकांनी खासगी

उस्मानाबाद : एका २३ दिवसांच्या मुलीच्या डोक्यात इंजेक्शनच्या सुईचा तुकडा निघाल्याचे गंभीर प्रकरण सोमवारी समोर आले आहे़ मुलीच्या पालकांनी खासगी रूग्णालयासह जिल्हा रूग्णालयात मुलीला दाखविल्यानंतर हा प्रकार आमच्या इथे झालाच नाही, असे उत्तर देत संबंधितांनी हात वर केले आहेत़ मात्र, मुलीच्या डोक्यात इंजेक्शनच्या सुईचा तुकडा निघाल्याने घाबरलेल्या पालकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, या प्रकरणात न्याय मिळावा, दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे़याबाबत अधिक वृत्त असे की, उस्मानाबाद तालुक्यातील तुगाव येथील संजय हनुमंत गडकर यांच्या पत्नी वर्षा यांना १८ जुलै रोजी शहरातील एका खासगी रूग्णालयात मुलगी झाली़ मात्र, वर्षा यांची प्रसूती सिझेरियनव्दारे झाली होती़ जन्मानंतर मुलीची प्रकृती चांगली नसल्याने काचेत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला़ त्यासाठी खासगी रूग्णालयाचे पत्र देवून जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले़ तीन दिवसानंतर त्या मुलीस पुन्हा खासगी रूग्णालयात आणण्यात आले़ तेथे उपचार सुरू असताना काविळ असल्याची लक्षणे सांगत पुन्हा जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले़ दोन दिवस तेथे उपचार घेतल्यानंतर मुलीस डिस्चार्ज देण्यात आला़ घरी आल्यानंतर मात्र, लहान मुलगी सतत रडत होती़ तिचे रडणे थांबत नसल्याने पालक घाबरून गेले होते़ ९ आॅगस्ट रोजी सकाळी तिच्या डोक्यात जखम असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले़ १० आॅगस्ट रोजी त्या जखमेच्या जागी पू येत असल्याने थोडे दाबले असता इंजेक्शनच्या सुईचा तुकडा बाहेर आला़ या प्रकाराने आई वडिल प्रचंड घाबरून गेले. पित्याने तातडीने सोमवारी जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालय गाठले़ त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली़ मात्र, सदरील प्रकार आमच्या रूग्णालयात घडलाच नाही, असे सांगत हात वर केले़ मात्र, मुलीच्या डोक्यात इंजेक्शनची सुई घुसल्याने भविष्यात तिला डोक्याचा आजार होण्याची भीती पालकांना सतावत आहे़ शिवाय भविष्यातील अशा प्रकाराला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित करीत जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालयातील संबंधित डॉक्टरांची चौकशी करून दोषींवर कारवाई करत कुटुंबाला व लहान मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी संजय गडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ (प्रतिनिधी)गडकर यांच्या लहान मुलीची मी तपासणी केली आहे़ तिच्या डोक्यातील जखम गंभीर नसून, घाबरण्याचे कारण नाही़ शिवाय आमच्या रूग्णालयातील काचेच्या भांड्यात तीला ठेवण्यात आले होते़ त्यामुळे इंजेक्शनची सुई वापरण्याचा संबंध नाही़ जिल्हा रूग्णालयात हा प्रकार घडला नसून, शिवाय असा प्रकार कोणी जाणून-बुजून करणार नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जयपाल चव्हाण यांनी सांगितले़अहवाल आल्यानंतर कारवाई४लहान मुलीच्या डोक्यात इंजेक्शनच्या सुईचा तुकडा निघाल्याची माहिती मला समजली आहे़ पालकाने निवेदन दिले असेल तर त्याची पाहणी करून याबाबतचा अहवाल मागवून घेणार आहे़ अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नारनवरे यांनी दिली़कारवाई करा४लहान मुलीच्या डोक्यात सुई निघाल्या प्रकरणात दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ निवेदनावर तालुकाध्यक्ष पाशुमियाँ शेख, जिल्हा सचिव संजय यादव, अभिजित पतंगे, गणेश जगताप, प्रमोद वाघमारे, बाळासाहेब सुभेदार, संजय गडकर आदीची स्वाक्षरी आहे़