शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील वकील आणि न्यायाधीशांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:15 IST

न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, न्या. पी.एन. भगवती, न्या. व्यंकट चलय्या यांच्यासारखे न्यायाधीश तक्रारीसाठी आलेल्या पत्रालाही जनहित याचिका समजून ती केस लढायचे. या सगळ्या मंडळींमध्ये कायद्याचा अभिनव अर्थ काढण्याची ताकद होती; पण आता मात्र जनहित याचिकांच्या दृष्टीने पत्रांकडे पाहणाºया न्यायाधीश आणि वकिलांची संख्या कमी झाली आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.

ठळक मुद्देअसीम सरोदे : ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’दरम्यान साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, न्या. पी.एन. भगवती, न्या. व्यंकट चलय्या यांच्यासारखे न्यायाधीश तक्रारीसाठी आलेल्या पत्रालाही जनहित याचिका समजून ती केस लढायचे. या सगळ्या मंडळींमध्ये कायद्याचा अभिनव अर्थ काढण्याची ताकद होती; पण आता मात्र जनहित याचिकांच्या दृष्टीने पत्रांकडे पाहणाºया न्यायाधीश आणि वकिलांची संख्या कमी झाली आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान आयोजित व समर्पण प्रतिष्ठान प्रस्तुत ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमाचे शनिवारी संत तुकाराम नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज गोविंदवार यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, डॉ. दिगंत व अनघा आमटे, एव्हरेस्टवीर रफिक शेख आदींशी संवाद साधला.यावेळी अ‍ॅड. सरोदे म्हणाले की, आजच्या वकिलांनी आम्हालाच कायदा कळतो, असा आविर्भाव सोडून देण्याची आणि सर्वसामान्य माणसाने कायदा समजून घेण्याची गरज आहे. कायदा हा सामान्य, शक्तिहीन, ताकद नसलेल्या माणसांना न्याय देण्यासाठी आहे; पण आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. त्यामुळे दीडशहाणी मंडळीच कोर्टात गर्दी करतात आणि त्यांना न्याय मिळतो. कचºयाच्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे यासारखे प्रश्न म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले. औरंगाबादमध्ये स्वच्छता सर्वेक्षण जाहिरातीचे फलक सगळीकडे दिसतात; पण या शहरात कचरा वर्गीकरण, कचरा प्रक्रिया यासारखी कोणतीही यंत्रणा नसताना या जाहिरातींवर पैसा खर्च करणे मूर्खपणाचे असल्याचेही ते म्हणाले.बाबा आमटेंचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविणारे डॉ. दिगंत व डॉ. अनघा आमटे या दाम्पत्यानेही उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. लहानपणी हेमलकसाला राहताना जगात इतर भौतिक सुविधा असतात, हे आम्हाला माहितीच नव्हते. त्यामुळे आमचे बालपण फार कष्टात गेले, असे आम्हाला मुळीच वाटत नाही. उलट शहरातल्या बंदिस्त जीवनापेक्षा आम्ही खूप मोकळे आणि समृद्ध जीवन जगलो याचा आनंद होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.शिवस्मारकास विरोधलोकप्रिय भावनांना तयार क रणे हे येथील राजकारण्यांचे इंधन आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज समुद्रात शिवस्मारक उभे राहत आहे. येथे बिनडोक लोकांचे समूह असून, त्यांना पुतळे दिले, की ते नाचत बसतात आणि मूलभूत अडचणी आपोआप विसरतात, हे येथील राजकारण्यांनी पक्के जाणले आहे. मात्र, पुतळ्यांपेक्षा येथील माणसे उभी राहण्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे, अशा रोखठोक भाषेत अ‍ॅड. सरोदे यांनी शिवस्मारकास विरोध दर्शविला.