शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज

By admin | Updated: June 17, 2014 01:14 IST

जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली

जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली असून, या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे. घाणेवाडी जलाशयापासूनच कुंडलिका नदी वाहते अशी अनेकांची धारणा आहे, परंतु नदीचा उगम हा अजिंठा डोंगरातून झाला आहे. घाणेवाडी, निधोना पुढे रामतीर्थपर्यंत नदीपात्रास आता बऱ्यापैकी स्वरूप आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्याचा पुढाकार त्यास कारणीभूत आहे. परंतु, रामतीर्थपासून ते मंठा बायपासपर्यंत पुढे दुधना नदीला मिळणाऱ्या या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरून संयुक्त तसेच नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांसह माध्यमांकडून वारंवार ओरड होऊनसुद्धा काडीचेही प्रयत्न होत नाहीत. हे दुर्दैव आहे. कुंडलिका नदीवर निधोना व रामतीर्थ या दोन ठिकाणी शिरपूर पॅटर्नवर आधारीत बंधारे उभारणीचे काम यशस्वीरित्या झाले. त्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी-उद्योजकांनी अवलंबिलेला सकारात्मक दृष्टीकोनच कारणीभूत ठरला. आता ही या नदीवरच शिरपूर पॅटर्नवर आधारीत सहा बंधारे उभारले जाणार आहेत. त्यादृष्टीकोनातून नदीवरील लोकेशन निश्चित झाले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतासुद्धा त्यास मिळाली आहे. आता, त्याचे कामही निविदास्तरावर आहे. एकूण वर्षभराखेर त्याचे काम सुरू होईल, असा अंदाज आहे. या बंधाऱ्यांमुळे जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ होईल, शेकडो शेतकऱ्यांना फायदा होईलच. परंतु, रामतीर्थपासून जुना व नवीन जालन्यातील बहुतांश वसाहतींमधून जाणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाकरीता याच पद्धतीने स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आजपर्यंत सरकारी पातळीवरून काडीचेही प्रयत्न झाले नाहीत. पालिका प्रशासनानेसुद्धा या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणासंदर्भात खऱ्या अर्थाने विचारसुद्धा केला नाही. उलटपक्षी या दोन्ही नद्यांमधून संपूर्ण शहराचे सांडपाणी व केरकचऱ्याची विल्हेवाट लावून नद्या बकाल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलिकडे तर या नद्यांमधून केरकचऱ्यासह माती-मुरूमाचा भराव टाकून जागाच हडप करण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. त्याकडेही पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी पद्धतशीरपणे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात दोन्ही नद्यांचे हे पात्र अरूंद होणार व या नद्यांना मोठ्या नाल्याचे स्वरूप येणार, हे स्पष्ट आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर या दोन्ही नद्या वाचविण्याकरीता हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, त्यास मर्यादा आहेत. त्यामुळे नद्यांच्या पुनरूज्जीवनाच्या कामांना वेग येणार नाही, हेच स्पष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे शहरातून जाणाऱ्या या दोन्ही नद्या वाहत्या केल्या, त्याचे सौंदर्यीकरण केल्यास शहराचे स्वरूप बदलू शकते, परंतु त्यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे. इच्छाशक्ती जागी झाल्यास या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग सहजपणे सुलभ होईल. दोन्ही नद्यांना पूर्वीचे स्वरूप प्राप्त होईल व शहरातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर पुनरूज्जीवीत होतील, हे निश्चित.