शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

३०० कोटीपेक्षा अधिकची वसुली हवी

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांची ‘धमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून जिल्ह्याचे राजकारण तापले आहे़

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांची ‘धमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून जिल्ह्याचे राजकारण तापले आहे़ डीसीसीने मे २०१४ अखेरपर्यंत जवळपास ७०० कोटी रूपयांचे शेती, बिगरशेतीचे कर्जवाटप केले आहे़ तर ठेवीदारांचे बँकेत ४१८ कोटी रूपये आहेत़ बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कर्जदारांकडील अनुत्पादक (थकित) जवळपास ३०८ कोटी रूपये आजघडीला वसूल होणे गरजेचे आहे.उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना व जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहेत़ जिल्हा बँक, तेरणा असो अथवा तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना असो शेतकरी, शेतमजुरांच्या अथक प्रयत्नातून या संस्था उभ्या राहिल्या आहेत़ प्रारंभीच्या काळात बँकेसह कारखान्याच्या कामकाजामुळे जिल्ह्याचे नाव राज्याच्या नकाशावर गेले होते़ सद्यस्थितीत जिल्हा बँकेचे सोसायटी सभासद १ लाख, ६४ हजार, ८७८, ठेवीदार सभासद ६ लाख, ३९ हजार तर २८९ संस्था सभासद आहेत़ डीसीसीने शेती, बिगर शेतीसाठी जवळपास ६९१ कोटी ८९ लाख, २४ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे़ तर ठेवीदारांचे बँकेत ४२७ कोटी, २३ लाख, ६६ हजार ९४१ रूपये आहेत़ ही रक्कम पाहता बँकेला कर्जवसुलीनंतर ३०० कोटीच्या जवळपास फायदा होऊन बँकेचे पुढील व्यवहार सुरळीत चालणार आहेत़ बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकींग परवाना मिळविण्यासह सीबीएससाठी मोठे प्रयत्न केले आहेत़ त्या प्रयत्नामुळे अपेक्षित कर्जवसुली झाल्याने बँकेला बँकींग परवाना मिळाला़ तर शेती, बिगर शेती कर्जाच्या थकबाकीदारांमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडेच मोठ्या रक्कमा थकल्याचे दिसून येते़ त्यामुळे नेतेमंडळींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राजकारण करण्याऐवजी स्वत:च्या कार्यकर्त्याकडील पैसा वसूल करून बँकेला देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज शेतकरी, ठेवीदार, सर्वसामान्यांतून होत आहे़ (प्रतिनिधी)६ कोटी कधी होणार वसूल ?जिल्हा बँकेचे जवळाबाजार (ता़औंढा नागनाथ जि़हिंगोली) येथील बाराशिव साखर कारखान्याकडून २ कोटी, १६ लाख, २९ हजार रूपये तर किल्लारी (ता़औसा जि़लातूर) येथील कारखान्याकडून ३ कोटी, ९८ लाख, ७८ हजार रूपयांची थकबाकी आहे़ जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना कर्जवाटप करून अनेक वर्षे लोटली तरी वसुली झालेली नाही़न्यायालयीन प्रक्रियेत अडकली वसुलीश्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना व तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेने कारवाई केली होती़ तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची जवळपास ३७ हेक्टर ५३ आर जमीन व कारखान्याचे प्लॅन्ट, मशनरी जप्त केले होते़ मात्र, कारखान्याने मुंबई येथील डीआरएटी न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर कर्जवसुली होणार आहे़केंद्र, राज्य शासनाकडून २३५ कोटी येणेजिल्हा मध्यवर्ती बँकेचे राज्य शासनाकडून थकहमीचे ११४ कोटी, केंद्र शासनाचे सन २०११-१२ व १२-१३ चे व्याजपरतावाचे १५ कोटी, ५० लाख, केंद्र व राज्य शासनाकडून वैद्यनाथ समितीचे ९८ कोटी ७६ लाख, खादी ग्रामोद्योग कर्जमाफीचे ६ कोटी ५० लाख असे जवळपास २३४ कोटी, ७६ लाख रूपये येणे आहे़ ही रक्कम शासनाकडून आणण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित जोर लावण्याची आवश्यकता आहे़