शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरविद्याशाखीय संशोधनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:43 IST

भाषा संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञानातील मौलिक विचार लक्षात घेता आंतरविद्याशाखीय संशोधन समोर आले तर जगाला ते मार्गदर्शक ठरतील, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी संचालक तथा भाषा तज्ज्ञ प्रा.डॉ.ए.जी. खान यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भाषा संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञानातील मौलिक विचार लक्षात घेता आंतरविद्याशाखीय संशोधन समोर आले तर जगाला ते मार्गदर्शक ठरतील, असे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी संचालक तथा भाषा तज्ज्ञ प्रा.डॉ.ए.जी. खान यांनी व्यक्त केले.येथील श्री शिवाजी महाविद्यालयात भाषा व वाणिज्य, व्यवस्थापन शाखेच्या वतीने ११ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय उद्बोधन शिबीर पार पडले. यावेळी भाषा संशोधनातील नव पैलू या विषयावर मार्गदर्शन करताना खान बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव तर उद्घाटक म्हणून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय विकास अधिकारी प्राचार्य आर.टी. देशमुख, उपप्राचार्य डॉ.विजया नांदापूरकर, डॉ.मदन परतूरकर आदींची उपस्थिती होती. खान म्हणाले, उच्च शिक्षणातील समान संधी ग्रामीण भागापर्यंत अजूनही पोहचली नाही. जे शिक्षण पोहचले त्यात गुणवत्ता नाही. त्यामुळे आजच्या समाजाला कौशल्यपूर्ण शिक्षणाची खरी गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन ही दीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. यातून रचनात्मक दृष्टीने समाजमन बदलले पाहिजे, हे संशोधकांनी समोर ठेवून अध्यापन, अध्ययन केले पाहिजे, असे ते म्हणाले. याप्रसंगी नांदेड येथील डॉ.सी.के. हरनावळे, डॉ.प्रभाकर हरकळ, डॉ.एम.एन. सोंडगे, उपप्राचार्य डॉ.सुरेश पैठणकर, डॉ.बळीराम धापसे, डॉ.अजय देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.