शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट साक्षरता वाढविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:56 IST

सध्याचा काळ हा माध्यमांचा काळ असून माध्यम मोठ्या प्रमाणावर आपल्यावर येऊन आदळत आहेत. ही माध्यमे अर्थकारण आणि सत्ताकारणाशी जोडलेली असल्याने चिकित्सक विचार करणे आवश्यक आहे. चित्रपट हेही एक माध्यम असून तो पाहताना निरिक्षण, चित्र वाचन, विश्लेषण ही दृष्टी असणे आवश्यक आहे. म्हणून चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट साक्षरता वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुंबई येथील प्रा. अभिजीत देशपांडे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सध्याचा काळ हा माध्यमांचा काळ असून माध्यम मोठ्या प्रमाणावर आपल्यावर येऊन आदळत आहेत. ही माध्यमे अर्थकारण आणि सत्ताकारणाशी जोडलेली असल्याने चिकित्सक विचार करणे आवश्यक आहे. चित्रपट हेही एक माध्यम असून तो पाहताना निरिक्षण, चित्र वाचन, विश्लेषण ही दृष्टी असणे आवश्यक आहे. म्हणून चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट साक्षरता वाढविणे गरजेचे आहे, असे मत मुंबई येथील प्रा. अभिजीत देशपांडे यांनी व्यक्त केले.गणेश वाचनालय आणि जनशक्ती वाचक चळवळीच्या वतीने १०, ११ व १२ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या बी.रघुनाथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी देशपांडे बोलत होते. चित्रपट कसा समजून घ्यावा, या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. दीपप्रज्ज्वलन आणि बी.रघुनाथांच्या प्रतिमा पूजनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रा.विश्वाधार देशमुख, अ‍ॅड.अनंतराव उमरीकर यांची उपस्थिती होती.देशपांडे म्हणाले, चित्रपट हे माध्यम १८९५ ला फ्रान्समध्ये जन्माला आले. विशिष्ट लेखनाला वाचक नसतील तर ते बंदिस्त होते. तसेच चित्रपटाचेही आहे. दृश्यकला समजून घेणारा रसिक महत्त्वाचा असतो. मुळातच सिनेमा हा माध्यमांशी संबंधित शब्द आहे. तसेच चित्रपट हा पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित असून ते वाणिज्यप्रधान माध्यम आहे. चित्रपट ही एक समूहकला आहे. आपण सर्वांनी थ्रीडी चित्रपट पाहिले पण आता फोरडी चित्रपट येत आहेत. येत्या दहा वर्षात चित्रपट सृष्टी पूर्णपणे बदलणार आहे. आपण माध्यमातून जग पाहणार आहोत. त्यामुळे चित्रपट हा आता पाम थिएटरमध्ये उपलब्ध झाला आहे. यासाठी कथा, नायक, पद्धती, गाणी आणि भव्यता म्हणजे चित्रपट समजून घेणे असे नाही.चित्रपटात विषय आणि दृश्यरचना महत्त्वाची आहे. हे सांगताना त्यांनी माध्यम साक्षरतेची पंचसूत्रीही सांगितली. यासाठी निरिक्षण, वाचन आणि विश्लेषण या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले.