शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ‘झीरो कचरा सप्ताह’ राबविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:47 IST

चौकाचौकात साचलेल्या कच-यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे केवळ एक दिवस निमित्त म्हणून स्वच्छता मोहीम घेण्याऐवजी आठवडभर झीरो कचरा सप्ताह राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी शनिवारी केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चौकाचौकात साचलेल्या कच-यामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे केवळ एक दिवस निमित्त म्हणून स्वच्छता मोहीम घेण्याऐवजी आठवडभर झीरो कचरा सप्ताह राबवून संपूर्ण शहर स्वच्छ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी शनिवारी केल्या.स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत जालना शहरात महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन आॅक्टोबरला पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत शहर स्वच्छता मोहीम व जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. या संदर्भातील नियोजन करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तहसीलदार विपिन पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, की दोन आॅक्टोबरला केवळ फोटोसेशन पुरती मोहीम न राबवता शहर खºया अर्थाने स्वच्छ होईल यासाठी व्यापक नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी या मोहिमेत शहरातील सामाजिक संस्था, सेवाभावी गु्रप, व्यापाºयांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या, की शहरात दररोज ८० टन कचरा निघतो, पैकी ६० टन कचºयाचे दररोज संकलन केले जाते. उर्वरित २० टन कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न पालिकेसमोर आहे. खासगी एजन्सीची नेमणूक करून हा कचरा उचलला जाईल. यापुढे रस्त्यावर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांनी आपला कचरा स्वत: संकलित करून कचराकुंडीत टाकावा. दुकाने, मंगल कार्यालये, हॉटेलचालकांनी रस्त्यावर अस्वच्छता करू नये, असे केल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी मुख्याधिकाºयांना दिल्या. मुख्याधिकारी खांडेकर यांनी स्वच्छता विभागात कर्मचारी संख्या कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. उपलब्ध कर्मचाºयांबरोबर खाजगी एजन्सीच्या माध्यमातून स्वच्छता राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.