औरंगाबाद : माईसाहेब आंबेडकर यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात मोठा त्याग आहे. एक डॉक्टर म्हणून माईसाहेब बाबासाहेबांची काळजी घेत असत. माईसाहेबांची योग्य साथ मिळाल्यानेच बाबासाहेबांच्या हातून खूप मोठमोठी कामे झाली, असे दिसून येईल म्हणून माईसाहेबांबद्दल पसरलेले गैरसमज दूर करण्याची गरज आहे, असे मत बुधवारी येथे माईसाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासिका प्रा.कीर्तिलता शिंदे यांनी व्यक्त केले.
कॅनाट प्लेस येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ माईसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अंबादास रगडे होते.
माईसाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवत कीर्तिलता पेटकर यांनी, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर काही दिवस अज्ञातवासात राहावे लागलेल्या माईसाहेब नंतर आंबेडकरी चळवळीत सक्रिय राहिल्याचे दिसून येते, हे अधोरेखित केले.
ॲड. नरहरी कांबळे यांनी व संघपाल धम्मकीर्ती यांनीही, माईसाहेबांच्या त्यागाचे मोल जाणण्याचे व त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन केले.
प्रारंभी माईसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. रामभाऊ पेटकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश धनेगावकर यांनी आभार मानले.