शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रबोधन आवश्यक

By admin | Updated: August 29, 2014 01:32 IST

औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या औरंगाबाद शहराची वाहतूक समस्याही क्लिष्ट होत चालली आहे. येथील रस्ते मोठे झाले तरी वाहतूक समस्या काही सुटलेली नाही.

औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या औरंगाबाद शहराची वाहतूक समस्याही क्लिष्ट होत चालली आहे. येथील रस्ते मोठे झाले तरी वाहतूक समस्या काही सुटलेली नाही. शंभर फुटी जालना रोडचा वापर ६० फुटांपर्यंतच होतोय. हे चित्र बदलून अपघातांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांचे प्रबोधन आवश्यक असून, त्या दृष्टीने नियोजित वाहतूक उद्यान उपयोगी ठरेल, असा विश्वास आज येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज येथे व्यक्त केला. सिद्धार्थ उद्यानात ते वाहतूक उद्यानाचे भूमिपूजन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर कला ओझा होत्या, तर मंचावर विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांची उपस्थिती होती. राजेंद्र सिंह व कला ओझा यांनी शहरातील वाहतूक समस्येवर प्रकाश टाकला. डीएमआयसीबद्दल अभिमानाने बोलत असताना शेंद्रा भागातील वाढती अतिक्रमणे ही चिंतेची बाब होय. या अतिक्रमणाकडे लक्ष वेधत राजेंद्र दर्डा यांनी ही अतिक्रमणे वेळीच काढून टाकण्याचीही सूचना यावेळी केली. टीम औरंगाबादच्या माध्यमातून येत असलेल्या विविध सूचनांकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. शहरात पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने वाहनधारकांकडून चुका होतात, असे ते म्हणाले. प्रारंभी, नामफलकाचे अनावरण करण्यात आले. २६ जानेवारीपर्यंत या वाहतूक उद्यानाचे काम पूर्ण होऊन ते जनतेसाठी खुले करावे, असे सध्या तरी ठरले आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी, उद्यान अधीक्षक विजय पाटील आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. डी.पी. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. असे राहील वाहतूक उद्यान....गतवर्षी औरंगाबाद शहरात किरकोळ स्वरूपाचे तसेच गंभीर स्वरूपाचे जवळजवळ ७१२ अपघात झाले. तसेच यंदा गेल्या सहा महिन्यांत ३०० पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. हे लक्षात घेऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सिद्धार्थ उद्यानात या वाहतूक उद्यानाची उभारणी करण्याचे ठरले.या वाहतूक उद्यानात ४५ प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना- पर्यटकांना त्यांच्या वाहनाची गती किती असावी, वाहन रस्त्याच्या कुठल्या भागात थांबवायचे यासाठी थांबा फलक लावण्यात येणार आहेत. याशिवाय नो एंट्रीचा फलक, ओव्हरटेक करताना घ्यावयाची काळजी, रेल्वेचे रूळ ओलांडताना काय काळजी घ्यावी, यासाठी सायकल किंवा पायी चालताना, शाळा- कॉलेजेस आले असता त्या ठिकाणी घ्यावयाची काळजी, यासंबंधीचे फलक लावण्यात येणार आहेत. तसेच विविध ठिकाणी वाहतूक सिग्नलही बसविण्यात येणार आहेत.या उद्यानात रेल्वे क्रॉसिंग, फ्लाय ओव्हरब्रिज, पादचारी मार्ग, अवघड वळण मार्ग व उंच बोगदा तयार करण्यात येणार आहे. आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी ही माहितीदिली.सध्या औरंगाबादमध्ये कार्यरत असलेली अधिकाऱ्यांची टीम चांगली आहे. त्यांच्यात योग्य समन्वय आहे. मनात आणले तर ते योग्य मार्ग काढून कामे करू शकतात, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात काढले. या दोन्ही कामांसाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून देण्यात आलाआहे. ४याकामी या सर्व अधिकाऱ्यांनी विशेष रुची घेतली, याचा राजेंद्र दर्डा यांनी विशेष उल्लेख करून ‘ही सारी टीम चांगले काम करीत आहे’ असे उद्गार काढले. मंचावर विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी विक्रमकुमार व मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाहतूक उद्यानात व कमल उद्यानाच्या सौंदर्यीकरणाच्या कामात या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातले, पाठपुरावा केला.