शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी दीड लाख क्विंटल बियाणांची गरज

By admin | Updated: May 14, 2017 23:04 IST

लातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़ तसेच या हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला आहे़ यंदाच्या हंगामात पेरणीसाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणांची आवश्यकता असून सर्वाधिक बियाणे सोयाबीनचे लागणार आहे़यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ त्यामुळे सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेतीची कामे आटोपण्यात व्यस्त आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणे, कुळवणी आदी तीव्र उन्हातली कामे पूर्ण केली आहेत़ ज्या थोड्याफार शेतकऱ्यांची ही कामे शिल्लक राहिली आहेत, ते ही कामे पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यात खरीपाचे साधारणत: साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र आहे़ वेळेवर पाऊस होणार असल्याने बहुतांश शेतकरी सध्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची दुरुस्ती, जुळवाजुळव करीत असल्याचे पहावयास मिळत आहे़ शेतकऱ्यांबरोबरच कृषी विभागही सज्ज झाला आहे़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या हंगामासाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणे आवश्यक असल्याचा अहवाल तयार करुन या बियाणांचा प्रस्ताव पुण्याच्या कृषी आयुक्तांकडे सादर केला आहे़ त्यापैकी ५४ हजार ८७ क्विं़ बियाणे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली़