शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सभापती निवडीतही निलंग्याला झुकते माप

By admin | Updated: April 3, 2017 22:44 IST

लातूर : जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची विषय समितीच्या सभापतीपदी सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली

लातूर : जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची विषय समितीच्या सभापतीपदी सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती निवडीतही निलंग्याला सर्वाधिक वाटा देण्यात आला असून, समाजकल्याण आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद निलंग्याला मिळाले आहे.पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. त्यात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले. २१ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाली. त्यात अध्यक्षपद निलंगा तालुक्याला बिनविरोध देण्यात आले. तर आता दोन सभापती पदे निलंगा तालुक्याला मिळाल्याने पालकमंत्र्यांचे तालुक्यावर विशेष प्रेम दिसून येत आहे.सोमवारी झालेल्या विषय समित्यांच्या निवडीत समाजकल्याण सभापतीपदी संजय दोरवे, महिला बालकल्याण- संगीता घुले, अर्थ व बांधकाम- प्रकाश देशमुख, कृषी व पशुसंवर्धनच्या सभापतीपदी बाळासाहेब जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. ५८ पैकी ३७ सदस्य भारतीय जनता पक्षाचे असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडही बिनविरोध झाली होती. सोमवारी विषय समितीच्या सभापतींच्या निवडी झाल्या. प्रत्येकी एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने सर्व सभापती बिनविरोध निवडून आले. अहमदपूर तालुक्यातील हडोळती मतदारसंघातील भाजपाचे प्रकाश देशमुख यांच्याकडे अर्थ व बांधकाम विभाग सोपविण्यात आला आहे. निलंगा तालुक्यातील कासारशिरसी गटातून निवडून आलेले बाळासाहेब जाधव यांना कृषी व पशुसंवर्धन, हलगरा गटातून निवडून आलेले संजय दोरवे यांच्याकडे समाजकल्याण तर रेणापूर तालुक्यातील कामखेडा गटातून निवडून आलेल्या संगीता घुले यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी बिनविरोध वर्णी लागली आहे.