शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

राष्ट्रवादी काँग्रेसला चार अपक्षांचे आव्हान

By admin | Updated: June 27, 2014 00:11 IST

औसा : औसा नगरपालीकेच्या प्रभाग ५ मधील सर्व साधारण महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेसाठी २९ जून रोजी मतदान होणार आहे़

औसा : औसा नगरपालीकेच्या प्रभाग ५ मधील सर्व साधारण महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेसाठी २९ जून रोजी मतदान होणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवीका सुरय्या मुक्तार कुरेशी यांनी राजीनामा दिल्यामुळे हि पोटनिवडणूक होत आहे़ निवडणूकीच्या रिंगणात एकूण ५ उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार चांदबी पटेल यांच्या विरोधात ४ अपक्ष उमेदवार लढतीत आहेत़ कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारच उभा केला नाही़ त्यामुळे हि निवडणूक अटीतटीची होत नसल्याचे चित्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिसून येत आहे़नगर पालीकेच्या गेल्या दोन्ही सार्वत्रीक निवडणूकीत प्रभाग 5 मधील सर्व तिनही जागा जिंकून राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम केले होते़ गेल्या निवडणूकीत या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस व शिवसेना भाजप युतीने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते़ मात्र आत्ताच्या पोटनिवडणूकीत या दोन्हीनीही उमेदवारच उभा केला नाही़ ही जागा राष्ट्रवादीची असल्यामुळे आम्ही उमेदवार उभा केला नसल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा़महम्मद हनिफ आलुरे यांनी सांगीतले़ तसेच यावेळी आम्ही आघाडीचा धर्मही पाळला असल्याचेही ते म्हणाले़प्रभाग ५ मध्ये अनुकूल राजकीय परिस्थितीत नसल्यामुळे आम्ही उमेदवार केला नसल्याचे शिवसेनेच शहरप्रमुख सुरेश भुरे यांनी स्पष्ट केले़ त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचा सुरू उमटत आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पटेल चांदबी अखलाख यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात पठाण तहसीन असलम (अपक्ष), मंगल काशिनाथ बेवनाळे (अपक्ष), शेख मेहराजबी ताजोद्दीन (अपक्ष), शेख रजियाबी नजीर साब (अपक्ष) या महिला उमेदवार लढत देत आहेत़ नगर पालीकेतील राष्ट्रवादीचे गटनेते अफसर शेख यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा आपल्या खाद्यांवर घेतली असून चांदबी पटेल यांच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत़ तर अपक्ष उमेदवार रजीयाबी शेख व तहसिन पठाण हे त्यांच्याशी निकराने झुंज देत असल्याचे चित्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पाहवयास मिळत आहे़ शेवटी कोण बाजी मारणार हे चित्र निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे़(वार्ताहर)रविवारी मतदान तर सोमवारी मोजणीरविवारी २९ जून रोजी औसातील नगर पालीकेच्या प्रभाग क्रं ़ ५ मधील सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेसाठी मतदान होणार असून ४१८४ मतदार संख्या असलेल्या या प्रभागातील पोट निवडणूकीची संपूर्ण तयारी झाली असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर पालीकेचे मुख्याधिकारी मल्लीकार्जुन पाटील यांनी सांगीतले असून या पोटनिवडणूकीची मतमोजणी सोमवारी होणार असल्याचेही त्यांनी लोकमतशी बोलतानी सांगीतले़