शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

By admin | Updated: May 4, 2016 00:28 IST

उस्मानाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीयांनी बांधलेली मोट फोल ठरल्याचे मंगळवारी झालेल्या

१५ जागांसह बहुमत : सर्वपक्षीयांचा धुव्वा, केवळ तीन जागांवर समाधानउस्मानाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीयांनी बांधलेली मोट फोल ठरल्याचे मंगळवारी झालेल्या मतमोजणीनंतर समोर आले़ मतदारांनी काँग्रेस, शिवसेना- भाजपाच्या सर्वपक्षीय पॅनलच्या उमेदवारांना नाकारून राष्ट्रवादीच्या तब्बल १५ उमेदवारांना मताधिक्याने निवडून दिले़ तर सर्वपक्षीय पॅनलचे केवळ तीन उमेदवार विजयी झाले असून, अपक्षांनाही मतदारांनी जोराचा झटका या निवडणुकीत दिला आहे़उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीपासून सर्वच संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना व भाजपाने एकत्रित येवून सर्वपक्षीय पॅनल उभा केला होता़ निवडणुक प्रचार कालावधीत राष्ट्रवादीच्या कामकाजावर ताशेरे ओढत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांनी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता़ तर राष्ट्रवादीचे माजी खा़ डॉ़ पद्मसिंह पाटील, आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांनी पक्षाच्या ताब्यात बाजार समिती असताना केलेल्या कामाचा लेखाजोखा मतदारासमोर ठेवून प्रचार यंत्रणा राबविली होती़ या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे १८, सर्वपक्षीयांचे १८ तर अपक्ष ८ असे ४४ उमेदवार निवडणुक रिंगणात होते़ उस्मानाबाद, बेंबळी, ढोकी व तेर येथील ११ बुथवर सोमवारी दिवसभर विविध मतदार संघनिहाय मतदान प्रक्रिया झाली होती़ या मतदान प्रक्रियेत ३२०२ मतदारांपैकी २९७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता़ राष्ट्रवादीसह सर्वपक्षीयांनी ही निवडणूक चुरशीची केल्याने मतदानही तब्बल ९४ टक्के झाले होते़उस्मानाबाद शहरातील तहसील कार्यालयातील महसूल भवनमध्ये मंगळवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला़ मतमोजणीनंतर आलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला सर्वाधिक १५ जागा मिळाल्या तर सर्वपक्षीयांच्या पॅनलचे केवळ तीन उमेदवार विजयी झाले़ विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीच्या पॅनलचे सोसायटी सर्वसाधारण मतदार संघातून निहाल कलीमोद्दीन काझी यांनी ६८३ मते घेवून विजय मिळविला़ तानाजी हरीराम गायकवाड (६९५), बाळासाहेब केशवराव घुटे (६८६), शाम लालासाहेब जाधव (७०४), दत्तात्रय विनायक देशमुख (६९३), उध्दव दादाराव पाटील (६५९), व्यंकट विनायक पाटील (६६३), ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातून दयानंद अभिमान भोयटे (६५०), ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून बबीता अरूण माने (६३६), अरूण आप्पासाहेब वीर (६०४), ग्रामपंचायत अनुसूचित जाती/ जमाती मतदार संघातून गोपाळ हरीबा आदटराव (६०४), सेवा सोसायटी महिला राखीव मतदार संघातून रोहिणी बालाजी नाईकवाडी ( ६९७), रत्नमाला बाळासाहेब शिनगारे (६९८), सोसायटी विमक्त जाती/ भटक्या जमाती मतदार संघातून युवराज नवनाथ शिंदे (७०६), सोसायटी इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून जिवन जितेंद्र हिप्परकर यांना ७०६ मते पडली़ तर सर्वपक्षीय उमेदवारांचे हमाल/ मापाडी मतदार संघातील अविनाश महादेव चव्हाण (१२०), व्यापारी मतदार संघातून श्रीराम मल्लीकार्जुन घोडके (३९७), सतीश बन्सीलाल सोमाणी (३८४) हे १८ उमेदवार विजयी झाले़ दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष केला़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिंदे यांनी काम पाहिले़ अपक्षांची दाणादाणकृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांना मतदारांनी पराभवाचा झटका दिला़ या निवडणूकीत अपक्षांचीही दाणादाण उडाली़ यात बाळासाहेब श्रीहरी जाधव यांना ०२ मते, रामलिंग नारायण धाबेकर (१०), रामलिंग गणपती जटाळे (०३), विनोद गजेंद्र गरड (०४), मेघराज काशिनाथ पाटील (१०), किशोर दत्तप्रसाद तिवारी (१७), रामलिंग सोमनाथ बिसले आणि दत्तात्रय सोमनाथ पाटील यांना प्रत्येकी ०४ मते मिळाली़पराभूत उमेदवारांची मते सर्वपक्षीयांच्या पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये भरत किसन गुंड (२६५), तानाजी शिवाजी जगदाळे २५५), संजय गौरीशंकर देशमुख (३३४), किसनराव लक्ष्मणराव पवार (३०४), अमोल दिनेश पाटील (३००), लिंबराज वसंत साळुंके (३०७), बापूराव लक्ष्मण सूर्यवंशी (३०४), अर्जुन प्रल्हाद बोणे (३०३), तुळशीदास लाला जमाले (२९८), अकलाख इसाक मेंढके (२९२), गणपती मारूती कांबळे (३२४), बबीता रंगनाथ कोळगे (३२०), राजश्री चंद्रकांत थोरात (३३३), सुधीर गणपतराव गायकवाड (३३३), धोंडीराम चांगदेव फुटाणे (३१७) यांचा समावेश आहे़ तर राष्ट्रवादीचे नारायण शंकर येलकर (३५), ज्ञानेश्वर रामदास पवार (३६९), संतोष जगन्नाथ हावडे (३६६) हे उमेदवार पराभूत झाले़