शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

अव्वल कारकून बनले नायब तहसीलदार; १७ जणांना पदोन्नती

By admin | Updated: August 11, 2014 01:56 IST

औरंगाबाद : महसूल खात्यातील १७ अव्वल कारकुनांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी पदोन्नतीचे आदेश जारी केले.

औरंगाबाद : महसूल खात्यातील १७ अव्वल कारकुनांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी पदोन्नतीचे आदेश जारी केले. या नियुक्त्या सरळ सेवेच्या कोट्यातील जागांवर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असणार आहेत.मराठवाड्यात महसूल खात्यांतर्गत नायब तहसीलदारांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे पदोन्नती आणि सरळ सेवा अशा दोन्ही संवर्गातून भरली जातात. गतवर्षी विभागात पदोन्नतीने नायब तहसीलदारांची काही पदे भरण्यात आली. तरीही सरळ सेवेतील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे खात्यांतर्गत पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांच्या निवड यादीतील १७ जणांना तात्पुरत्या स्वरूपात या पदांवर पदोन्नतीने पदस्थापना दिली आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील ७, जालना जिल्ह्यातील ३, नांदेड जिल्ह्यातील १, बीड जिल्ह्यातील ३, उस्मानाबाद जिल्ह्यातील २ आणि लातूर जिल्ह्यातील १ अव्वल कारकून नायब तहसीलदार बनले आहेत.मात्र, या पदोन्नत्या तात्पुरत्या असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने नियुक्ती आदेशात स्पष्ट केले आहे. सरळ सेवेच्या कोट्यातील पदांवर लोकसेवा आयोगाकडून उमेदवार प्राप्त होईपावेतो किंवा निव्वळ ११ महिन्यांकरिता यापैकी जो आधी घडेल त्या कालावधीकरिता या नियुक्त्या असणार आहेत. वरीलपैकी कोणतीही एक गोष्ट घडल्यानंतर सदर पदोन्नत्या संपुष्टात येतील. तात्पुरत्या पदोन्नत्या मिळालेल्यांमध्ये व्ही. टी. पाटील, पी. एच. आवटे (उस्मानाबाद), डी. एम. कांबळे (लातूर), युसूफजई समिउल्ला खान, एस. एस. रामदासी, सचिन वाघमारे (बीड), रफिक बशिरोद्दीन (नांदेड), सी. व्ही. जोशी, के. डी. सोनवणे, व्ही. पी. दावणगावकर (जालना), छाया चौधर, रजनी लोखंडे, व्ही. जी. देशमुख, डी. एन. पवार, मोहंमद नूर, महंमद सलीम आणि ए. जी. कापसे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे.