औरंगाबाद : देवीच्या विविध रूपांचा महिमा सांगणाऱ्या तसेच आदिशक्तीचा जागर करून तिचा सन्मान करणाऱ्या नवरात्रोत्सवाची सगळीकडे जोरदार तयारी सुरू झाली आहे. पवित्रता आणि प्रसन्नतेची उधळण करणारा हा उत्सव म्हणजे समस्त ‘स्त्री’ वर्गाचीच यशोगाथा वर्णन करणारा आहे. या उत्सवाच्या निमित्ताने गौरव होत असतो तो रणरागिणीप्रमाणे तळपणाऱ्या अनेक स्त्री रूपांचा. अशा स्त्रीशक्तीचा ‘लोकमत’ने नेहमीच गौरव केला आहे. आता नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकमत’च्या वतीने खास महिलांसाठी विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या महिलांच्या भव्य सायकल रॅलीने या उत्सवाचा शुभारंभ होत आहे. महिलांची मोटरबाईक रॅली हेदेखील या उत्सवाचे आकर्षण असेल. याशिवाय महिलांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांनी हा नवरात्रोत्सव सजलेला आहे. ‘सखी सन्मान अवॉर्ड’ या कार्यक्रमाद्वारे कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरवही होईल. नवरात्रीचा खरा आनंद आहे, तो नवरंगात रंगून दांडिया खेळण्यात. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजनही या निमित्ताने करण्यात आले आहे. चला तर मग.. एका नवीन उमेदीसह नवरात्रीच्या या विविधरंगी कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज व्हा...
विविध कार्यक्रमांनी रंगणार नवरात्रोत्सव!
By admin | Updated: September 26, 2016 00:36 IST