शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावातील मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप

By admin | Updated: June 11, 2014 00:25 IST

माजलगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी असलेल्या नाल्यांची साफसफाई कोणी करावी? याबद्दल नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद चालू आहे.

माजलगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी असलेल्या नाल्यांची साफसफाई कोणी करावी? याबद्दल नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद चालू आहे. या दोघांच्या वादात नालेसफाईचे काम रखडले असून, याचा त्रास वाहनधारकांसह पादचारी व परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.माजलगाव शहराचा मुख्य रस्ता हा संभाजी चौक ते सिंदफणा नदीपात्रापर्यंतचा आहे. या मुख्य रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करतो. यावर रस्त्याचे काम असो वा नाली बांधकाम, हे आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडून केलेले आहे. यापूर्वी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या नाल्या साफ करण्याचे काम केले जात असे; परंतु मागील दोन वर्षांपासून या शहरातील मुख्य रस्त्यावरील नाल्यांची साफसफाई या विभागाकडून करण्यात आली नसल्याने या भागातील नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. नाल्यात येणारे घाण पाणी कचऱ्याला आडून रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. हे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने दोन महिन्यापूर्वीच अडीच कोटी रुपये खर्चून रस्त्याचे काम करण्यात आले होते. या रस्त्यावर पाणी येत असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. या खड्ड्यांसह नाल्यातून रस्त्यावर आलेल्या घाण पाण्याचा त्रास वाहनधारकांसह पादचारी व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. साफसफाई करण्याची मागणी सर्वसामान्यांतून केली जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावरील नालीचे घाण पाणी अंगावर उडून येत आहे. सार्वजनिक विभाग व नगरपालिकेच्या वादात पावसाळा आला असतानाही नाल्या साफ करण्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. याचा त्रास रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांसह परिसरातील व्यापाऱ्यांना होत आहे.काय म्हणाले अधिकारी...याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एम.बी. शिंदे म्हणाले, मुख्य रस्त्यावरील नाल्या साफसफाईचे काम आमच्या विभागाचे नसून, ते नगरपालिकेचे आहे. तर न.प.चे नगराध्यक्ष डॉ. अशोक तिडके म्हणाले, सा.बां. विभागांतर्गत हा मुख्य रस्ता येत असल्याने या रस्त्याजवळील नाल्या सफाईचे काम याच विभागाचे आहे. मागील वर्षीही त्यांनी नाले सफाई न केल्याने हे काम नगरपालिकेनेच केले होते. आमची आर्थिक परिस्थिती क्लिष्ट असल्याने आम्हाला हा खर्च परवडत नाही, असे सांगून सा.बां व न.प.ने आपल्या जबाबदाऱ्या झटकून दिल्या. (वार्ताहर)