औरंगाबाद : सगळीकडे हिरवळ, झुळझुळणारे झरे, आकाशात मुक्त विहार करणारे पक्षी, अथांग समुद्रकिनारा, मंद वाहणारी नदी अशी अनेक कल्पनाचित्रे रविवारी चिमुकल्यांच्या भावविश्वातून साकारली गेली. औचित्य होते लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला चिमुकल्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना ‘पर्यावरण’ हा विषय देण्यात आला होता. यामध्ये पर्यावरणाशी संबंधित कोणतेही चित्र काढायचे होते. विषयाची मर्यादा नसल्यामुळे चिमुकल्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन निसर्गाची अनेक रूपे चितारली. अनेक विद्यार्थ्यांनी जनजागृती करणारी चित्रे काढली. ‘कचरा मुक्ती’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’, ‘वृक्षतोडीला आळा घाला’ यासारखे अनेक संदेश चित्रांच्या माध्यमातून दिले. यातून बालवयातच पर्यावरणाविषयी आलेली जागरूकता दिसून येते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे तीन वयोगट करण्यात आले होते. सर्व वयोगटांसाठी परीक्षक म्हणून राजा रविवर्मा महाविद्यालयाचे प्राचार्य उदय भोईर, प्रा. महेंद्र खाजेकर, प्रा. अस्वलकर, जकिया पठाण, विनोद भोरे आदींनी काम पाहिले. त्यांना योगेश सनान्से व विवेक पाटील यांचे सहकार्य लाभले. नवीन सदस्यता नोंदणी सुरूजुलै महिन्यापासून कॅम्पस क्लबसाठी नवीन सदस्यता नोंदणी सुरू होत आहे. तेव्हा बालमित्रांनो, नावनोंदणी करा आणि वर्षभर चालणाऱ्या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद लुटा.स्पर्धेतील विजेतेपहिली ते चौथी गट : उदित राठी - प्रथम, साक्षी तोष्णीवाल- द्वितीय, सिद्धी दोडिया- तृतीय.उत्तेजनार्थ पारितोषिके- अर्णव सदावर्ते, हर्षदा दस्तपुरे, सानिका वळणीकर, आदिती देशमुख, तेजस शेळके.पाचवी ते सातवी गट :विधी मंत्री - प्रथम, वृषाली वाघ- द्वितीय, वैष्णवी धावणे- तृतीय.उत्तेजनार्थ पारितोषिके - मुग्धा महिंद्रकर, ओजस ठाकरे, सृष्टी महाजन, साक्षी शेळके, ऋतुजा हिरेआठवी ते दहावी गट :करिश्मा साहूजी - प्रथम, क्षमा देशपांडे- द्वितीय, काजल गरेवाल- तृतीय.उत्तेजनार्थ बक्षिसे - पूनम जाधव, श्रद्धा बाऱ्हाळस्कर, ऋषी काळे, सृष्टी पाटील, तन्वी उंबरहांडे
बालगोपालांनी कागदावर चितारला स्वप्नातला निसर्ग
By admin | Updated: June 5, 2016 23:53 IST