शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँका पीककर्जासाठी उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:08 IST

सातत्याने दुष्काळाच्या फेºयात अडकेल्या शेतकºयांना पीककर्ज वेळेत आणि सुलभरित्या वाटप करण्याच्या राज्य शासनाच्या सूचना असल्या तरी त्या सूचना, आदेशांना डावलून शेतकºयांना पीककर्ज देण्यात बँकांकडून उदासीनताच दाखवली जात आहे़ जिल्ह्यात आजघडीला केवळ २३ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सातत्याने दुष्काळाच्या फेºयात अडकेल्या शेतकºयांना पीककर्ज वेळेत आणि सुलभरित्या वाटप करण्याच्या राज्य शासनाच्या सूचना असल्या तरी त्या सूचना, आदेशांना डावलून शेतकºयांना पीककर्ज देण्यात बँकांकडून उदासीनताच दाखवली जात आहे़ जिल्ह्यात आजघडीला केवळ २३ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे़जिल्ह्यातील शेतकºयांना पीककर्ज वाटपाची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकावर सोपविली आहे़ जिल्ह्यात १ लाख ५२ हजार ४२ शेतकºयांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते़ त्यातील ८७ हजार ८८ शेतकºयांना पीककर्ज उपलब्ध झाले आहे़ इतर शेतकरी मात्र पीककर्जापासून वंचितच राहिले आहेत़ पीककर्ज वाटपात नांदेड जिल्हा सहकारी बँकेने चांगली कामगिरी करताना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ६१ हजार शेतकºयांना १३७ कोटी ४२ लाख रूपये कर्ज वाटप केले आहे़ जिल्हा बँकेच्या पीककर्ज वाटपाची टक्केवारी ही ९८़२८ टक्के इतकी आहे़ तर जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांनी केलेल्या पीककर्ज वाटपाची टक्केवारी ही केवळ १४ टक्के तर ग्रामीण बँकेची जवळपास २८ टक्के इतकी टक्केवारी आहे़ राष्ट्रीयकृत बँकांनी १८ हजार २४८ शेतकºयांना १६७ कोटी ५४ लाख आणि ग्रामीण बँकामधून ७ हजार ६५९ शेतकºयांना ५५ कोटी १५ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़कर्जमाफी मिळणार असल्याची शेतकºयांना अपेक्षा होती़ त्यामुळे आपल्याकडील कर्ज शेतकºयांनी भरण्यास टाळाटाळ केली होती़ त्यात दुष्काळी परिस्थितीचाही शेतकºयांना मोठा फटका बसला होता़ परिणामी थकीत कर्ज तशीच राहिली़ पूर्वीचे कर्ज न भरल्याने राष्ट्रीयकृत बँकांनी चालू वर्षात नवे पीककर्ज देण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले जात आहे़ शासनाच्या नवनव्या आदेशामुळेही पीककर्ज वाटपाची टक्केवारी खाली आली आहे़